Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI 2nd T20: सामान वेळेवर पोहोचलं नाही, भारत-वेस्ट इंडिज सामना दोन तास उशिराने होणार सुरु

भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील आज दुसरा सामना होणार आहे. निर्धारित वेळेत हा सामना सुरु होणार नाही.

IND vs WI 2nd T20: सामान वेळेवर पोहोचलं नाही, भारत-वेस्ट इंडिज सामना दोन तास उशिराने होणार सुरु
ind vs wi
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 7:20 PM

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील आज दुसरा सामना होणार आहे. निर्धारित वेळेत हा सामना सुरु होणार नाही. दोन तास उशिराने सामना सुरु होईल. सोमवारी 1 ऑगस्टला सेंट किट्स येथे दोन्ही टीम्स मध्ये सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरु होणार होता. पण आता हा सामना 10 वाजता सुरु होईल. या विलंबाच कारण ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. पाऊस, खराब वातावरण किंवा मैदान ओलसर असल्यामुळे हा विलंब होतोय, असं तुम्हाला वाटेल. पण असं नाहीय. संघाचं सामान वेळेवर न पोहोचल्यामुळे हा विलंब होतोय.

अडीच तास आधी दिली माहिती

क्रिकेट वेस्ट इंडिजने सोमवारी 1 ऑगस्टला सामना सुरु होण्याच्या अडीच तास आधी सामन्याच्या विलंबाच्या कारणाची माहिती दिली. विंडिज बोर्डाने सांगितलं की, सामना दुपारी 12.30 वाजता (म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता) सुरु होईल. विंडिज बोर्डाने त्यासाठी जे कारण दिलय, तसं आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये कदाचितच तुम्ही आधी ऐकलं असेल.

हैराण करुन सोडणारं कारण

सामन्याआधी खेळाडूंच सामान वेळेवर पोहोचलेलं नाही. त्यामुळे सामना उशिराने सुरु करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं विडिंज बोर्डाने म्हटलं आहे.

श्रेयस अय्यरचा फॉर्म

पहिल्या मॅच मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिज वर सहज विजय मिळवला होता. हेड कोच राहुल द्रविड यांचा, आजचा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. भारतीय संघाने पहिला सामना जिंकला आहे. पण काही बाबींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. खासकरुन श्रेयस अय्यरचा फॉर्म. श्रेयस अय्यरने वनडे मध्ये जबरदस्त कामगिरी केलीय. पण टी 20 मध्ये तो संघर्ष करतोय. टीम मॅनेजमेंटला काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हेड कोच राहुल द्रविड यांनी पहिल्या टी 20 सामन्यात श्रेयस अय्यरवर विश्वास दाखवला. पण त्याच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. श्रेयस अय्यर 4 चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकने डाव सावरला.