IND vs WI, 3rd ODI, LIVE Streaming: जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना
वेस्ट इंडिज विरुद्ध आज मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. हा सामना फक्त औपचारीकता मात्र आहे. भारताचा मालिकेत क्लीन स्वीप विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल.
अहमदाबाद: वेस्ट इंडिज विरुद्ध आज मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. हा सामना फक्त औपचारीकता मात्र आहे. भारताचा मालिकेत क्लीन स्वीप विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या तिसऱ्या वनडेमध्ये शिखर धवन (Shikhar Dhawan)खेळणार आहे. स्वत: रोहित शर्मानेच हे संकेत दिले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे शिखरला पहिल्या दोन वनडे सामन्यांना मुकावे लागले होते. त्याच्याजागी पहिल्या सामन्यात इशान किशन (Ishan Kishan) तर दुसऱ्या वनडेत ऋषभ पंत (Rishabh Pant) सलामीला आला होता. हे दोन्ही प्रयोग यशस्वी होऊ शकले नाहीत. वेस्ट इंडिजने मालिका आधीच गमावली आहे. पण प्रतिष्ठा वाचवण्याच्या उद्देशाने तिसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजचा संघ मैदानात उतरेल. मागच्या 17 वनडे सामन्यांमध्ये 11 वेळा वेस्ट इंडिजचा संघ पूर्ण 50 षटकही खेळू शकलेला नाही. कर्णधार कायरन पोलार्ड, अष्टपैलू जेसन होल्डर यांना जबाबदारीने खेळावे लागेल. शाई होप, ब्रँडन किंग आणि निकोलस पूरन यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तिसरा वनडे सामना कधी खेळला जाणार? भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तिसरा वनडे सामना 11 फेब्रुवारीला (शुक्रवारी) खेळला जाणार आहे.
भारत-वेस्ट इंडिजमध्ये तिसरी वनडे मॅच कुठे होणार? भारत-वेस्ट इंडिजमध्ये तिसरा वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमयवर खेळला जाणार आहे.
भारत-वेस्ट इंडिजमध्ये तिसरी वनडे मॅच कधी सुरु होणार? भारत-वेस्ट इंडिजमध्ये तिसरी वनडे मॅच दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. टॉस दुपारी 1.00 वाजता होईल.
या सामन्याचं लाइव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वाहिनीवर वेगवेगळ्या भाषांमध्ये तुम्ही भारत-वेस्ट इंडिज सामन्याचं लाइव्ह टेलिकास्ट पाहू शकता.
भारत-वेस्ट इंडिज सामन्याचं ऑनलाइन लाइव स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल? मॅचच ऑनलाइन लाइव स्ट्रीमिंग हॉटस्टारवर पाहू शकता. पण त्यासाठी तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असलं पाहिजे.