IND vs WI 3rd ODI Match Preview: सीरीज जिंकली, रेकॉर्डवर नजर, धवन इतिहास बदलणार?
मागच्या 15 वर्षात भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध (IND vs WI) सलग 12 वी वनडे सीरीज जिंकली आहे. या 12 सीरीजपैकी जितक्या मालका वेस्ट इंडिज (West indies) मध्ये झाल्या, त्यात एक कमतरता राहिली.
मुंबई: मागच्या 15 वर्षात भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध (IND vs WI) सलग 12 वी वनडे सीरीज जिंकली आहे. या 12 सीरीजपैकी जितक्या मालिका वेस्ट इंडिज (West indies) मध्ये झाल्या, त्यात एक कमतरता राहिली. ही कमतरता यावेळी भरुन काढण्याची संधी आहे. भारताने पहिले दोन वनडे सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. आता भारताकडे मालिकेत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली टीम इंडियाने अशी कामगिरी केली, तर एक नवा इतिहास रचला जाईल.
टीम मध्ये बदल करणार?
पहिले दोन सामने जिथे झाले, त्या पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल पार्कवर तिसरा सामना होणार आहे. बुधवारी म्हणजे आज सामना होणार आहे. टीम इंडिया आजच्या सामन्यासाठी संघात काही बदल करणार का? त्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. हेड कोच राहुल द्रविड काही नवीन खेळाडूंना संधी देऊ शकतात. पण विजयी लय कायम ठेवून संघात संतुलन साधण्याचा ते प्रयत्न करतील.
इशान-गायकवाडला संधी मिळणार?
टीम इंडियाला सर्वात जास्त अपेक्षा सूर्यकुमार यादवकडून आहेत. मागच्या पाच वनडे सामन्यात सूर्यकुमारला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. इंग्लंड दौऱ्यात शेवटच्या टी 20 सामन्यात त्याने शानदार शतक झळकावलं होतं. मात्र त्यानंतर तो मोठी खेळी करु शकलेला नाही. सूर्यकुमार यादवला आजच्या सामन्यात संधी मिळेल. ओपनिंग मध्येही बदल होण्याची शक्यता नाहीय. शिखर धवन आणि शुभमन गिलच सुरुवात करतील. इशान किशन आणि ऋतुराज गायकवाडला प्रतिक्षा करावी लागेल.
रवींद्र जाडेजाच्या फिटनेसवर नजर
स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा शेवटच्या सामन्यात खेळणार की, नाही? याकडेही नजरा असतील. त्याला या सीरीजसाठी उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. गुडघे दुखापतीमुळे तो पहिल्या दोन सामन्यात खेळला नाही. तिसऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्याबद्दल निर्णय नंतर होईल, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं होतं. त्याच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलला संधी मिळेल. मागच्या दुसऱ्या सामन्यात तो विजयाचा नायक ठरला होता. 35 चेंडूत त्याने नाबाद 64 धावा फटकावल्या होत्या.
वेगवान गोलंदाजीत बदल ?
भारताने पहिल्या दोन सामन्यात वेगवान गोलंदाजीत बदल केला होता. जो फार यशस्वी ठरला नाही. पहिल्या सामन्यात कृष्णा महागडा गोलंदाज ठरला. दुसऱ्यासामन्यात त्याच्याजागी डेब्यु करणारा आवेश खान प्रभावहीन ठरला. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहचा आवेश खानच्या जागी संघात समावेश केला जाऊ शकतो.