IND vs WI: ‘म्हणजे मी आणि धवन संघाबाहेर जाऊ का?’ रोहित शर्मा पहिल्या वनडेआधी असं का म्हणाला?

भारत-वेस्ट इंडिज (India vs West Indies ODI) दरम्यानच्या पहिल्या वनडेआधी त्याने प्लेईग इलेवन वरुन हे वक्तव्य केलं.

IND vs WI: 'म्हणजे मी आणि धवन संघाबाहेर जाऊ का?' रोहित शर्मा पहिल्या वनडेआधी असं का म्हणाला?
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 4:49 PM

अहमदाबाद: रोहित शर्मा (Rohit sharma) पत्रकार परिषदेदरम्यान अनेकदा गमतीशीर वक्तव्य करतो. भारताच्या वनडे (Indian Cricket Team)आणि टी-20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनल्यानंतर रोहितचा आज हाच अंदाज पहायला मिळाला. भारत-वेस्ट इंडिज (India vs West Indies ODI) दरम्यानच्या पहिल्या वनडेआधी त्याने प्लेईग इलेवन वरुन जे वक्तव्य केलं, ते ऐकून सर्वांनाच हसू आलं. रोहित शर्माला पत्रकारांनी पहिल्या तीन पोजिशनवर युवा खेळाडूंना संधी मिळण्यासंबंधी प्रश्न विचारला. त्यावर त्याने गमतीशीर उत्तर दिलं. “म्हणजे तुम्हाला म्हणायचय की, ऋतुराज गायकवाड, इशान किशनला सलामीवीर बनवलं पाहिजे. मला आणि शिखर धवनला संघाबाहेर केलं पाहिजे का?” असा गमतीने त्याने प्रतिप्रश्न केला. हे बोलताना स्वत: रोहित शर्माला सुद्धा हसू आवरलं नाही. त्याचबरोबर प्रश्न विचारणारे पत्रकारही हसू लागले.

युवा खेळाडूंना निश्चित संधी मिळेल युवा खेळाडूंना निश्चित संधी मिळेल, हे रोहितने स्पष्ट केलं. इशान किशन त्याच्यासोबत उद्या ओपनिंगला येणार असल्याचं त्याने सांगितलं. शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाडला कोरोना झाल्याने, त्यांच या मालिकेत खेळणं मुश्किल दिसतय. इशान किशनला म्हणूनच सलामीची संधी मिळत आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध आधी संघाची घोषणा केली, तेव्हा इशान किशन संघाचा भागही नव्हता.

तिघांचं खेळणं निश्चित नाही “धवन, गायकवाड आणि श्रेयस अय्यर तिघेही आयसोलेशनमध्ये आहेत. ते खेळण्यासाठी कधी उपलब्ध होतील, या बद्दल अजून स्पष्टता नाहीय. सध्या तिघेही आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण त्यांच्या खेळण्याबद्दल आताच काही निश्चिपणे सांगता येणार नाही” असं रोहित म्हणाला.

कोरोनामुळे संघाचा बॅलन्स बिघडतो कोरोनामुळे स्थिती खराब होते आणि संघाचा बॅलन्स बिघडतो असे रोहितने सांगितले. “कोरोनामुळे कठीण स्थिती आहे. कोरोनामुळे बरच काही अनिश्चित आहे. असं काही घडल्यानंतर बर होण्याचा वेगवेगळा कालावधी असतो. अनेकदा सात-आठ दिवस लागतात. काही वेळा 14 दिवसही लागतात” असे रोहितने सांगितलं.

India vs west indies first odi Me & dhawan should out of the team Rohit sharma said in press conference

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.