IND VS WI T 20: तीन दिवसांपूर्वी ऑक्शनमध्ये 10.75 कोटी कमावणाऱ्या विंडिजच्या खेळाडूची पैसा वसूल फलंदाजी, SRH खूष

IND VS WI T 20: वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूने आज भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात दमदार कामगिरी केली. आज त्याने पैसा वसूल फलंदाजी दाखवली.

IND VS WI T 20: तीन दिवसांपूर्वी ऑक्शनमध्ये 10.75 कोटी कमावणाऱ्या विंडिजच्या खेळाडूची पैसा वसूल फलंदाजी, SRH खूष
IPL Auction
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 9:44 PM

कोलकाता: तीन दिवसांपूर्वी IPL Mega Auction 2022 मध्ये मालामाल झालेल्या वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूने आज भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात दमदार कामगिरी केली. आज त्याने पैसा वसूल फलंदाजी दाखवली. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये विकत घेणारे फ्रेंचायजी निश्चित आनंदी असतील. वेस्ट इंडिजने भारताला पहिल्या टी 20 सामन्यात विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य दिले आहे. त्यात विकेटकिपर फलंदाज निकोलस पूरनचे (Nicholas Pooran) योगदाने आहे 61 धावांचे. निकोलस पूरनने 43 चेंडूत 61 धावा तडकावताना चार चौकार आणि पाच षटकार लगावले. म्हणजे 46 धावा चौकार-षटकारांनी काढल्या. कायली मेयर्स (Mayers) बाद झाल्यानंतर पूरनने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याच्या फलंदाजीमुळेच वेस्ट इंडिजला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. संघाला गरज असताना त्याने आज उत्तम खेळ दाखवला.

सहकाऱ्यांना दिली पिझ्झा पार्टी

तीन दिवसांपूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने त्याच्यावर तब्बल 10.75 कोटींची बोली लावून विकत घेतलं. आयपीएलमध्ये इतकी किंमत मिळाल्यानंतर पूरनने आपल्या सहकाऱ्यांना पिझ्झा पार्टी दिली. त्याने 15 पिझ्झा ऑर्डर केले. त्यासाठी 15 हजार रुपये खर्च आला.

मागच्या सीजनमध्ये फ्लॉप

आयपीएल 2021 च्या सीजनमध्ये त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना 7.72 च्या सरासरीने 12 सामन्यात 85 धावा केल्या होत्या. भारताविरुद्धच्या वनडे सीरीजमध्येही त्याची कामगिरी फार चांगली नव्हती. पण अशी खराब कामगिरी असूनही SRH ने त्याला तब्बल 10.75 कोटींना विकत घेतलं. आज पहिल्या टी 20 मध्ये त्याची कामगिरी पाहून SRH फ्रेंचायजी नक्कीच खूष झाली असेल.

अशी आहे पूरनची कामगिरी

निकोलस पूरनने 37 वनडे सामन्यांमध्ये 1121 धावा केल्या आहेत. यात 118 त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. टी 20 च्या 54 सामन्यांमध्ये त्याने 1009 धावा केल्या आहेत. 70 त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मागच्या सीजनमध्ये फारशी चमकदार कामगिरी न करता 10.75 कोटी आयपीएलमध्ये मिळणे, हे पूरनसाठी लॉटरी लागण्यासारख आहे. त्याची बेस प्राइस 10.75 कोटी होती.

मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.