IND vs WI ODI Series: दोन दिवसांचा प्रवास करुन रोहितच्या टीमला भिडण्यासाठी पोर्लाडचा संघ अहमदाबादमध्ये दाखल

अहमदाबाद: टी-20 मालिकेत (T 20 Series) इंग्लंडला नमवून आत्मविश्वास उंचावलेला कायरन पोलार्डचा (Kieron Pollard) वेस्ट इंडिज संघ (West indies team) आज सकाळी अहमदाबादमध्ये दाखल झाला. वेस्ट इंडिजचा संघ येत्या सहा फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताविरोधात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर भारताविरोधात तीन टी-20 सामन्यांची […]

IND vs WI ODI Series: दोन दिवसांचा प्रवास करुन रोहितच्या टीमला भिडण्यासाठी पोर्लाडचा संघ अहमदाबादमध्ये दाखल
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 11:12 AM

अहमदाबाद: टी-20 मालिकेत (T 20 Series) इंग्लंडला नमवून आत्मविश्वास उंचावलेला कायरन पोलार्डचा (Kieron Pollard) वेस्ट इंडिज संघ (West indies team) आज सकाळी अहमदाबादमध्ये दाखल झाला. वेस्ट इंडिजचा संघ येत्या सहा फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताविरोधात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर भारताविरोधात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. “बार्बाडोसवरुन दोन दिवसांचा प्रवास करुन वेस्ट इंडिजचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला” असे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले वेस्ट इंडिज संघातील बहुतेक खेळाडू पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएलच्या !5 व्या सीजनमध्ये खेळताना दिसतील. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड स्वत:च मुंबई इंडियन्सकडून खेळतो.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या आगमनाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. गुजरात क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर हे तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. कोरोनामुळे रिकाम्या स्टेडियममध्ये हे सामने खेळवले जातील, असं गुजरात क्रिकेट असोशिएशनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दुसऱ्याबाजूला पश्चिम बंगाल सरकारने तीन टी-20 सामन्यांच्या सीरीजसाठी इडन गार्डन्सवर 75 टक्के प्रेक्षक उपस्थितीला परवानगी दिली आहे.

पोलार्डने काय म्हटलय? “कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध खेळण्यास मी खूपच उत्सुक्त आहे. माझ्यासाठी हे विशेष असेल” असं पोलार्डने म्हटलं आहे. येत्या 6 फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये वनडे मालिका सुरु होणार आहे.

“इंग्लंड विरुद्ध चांगला विजय मिळवला. आता भारत दौऱ्यात अशाच पद्धतीचा सकारात्मक खेळण्याचा आमचा प्रयत्न असेल. रोहित शर्मा नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध खेळण्यास आम्ही उत्सुक्त आहोत. आमच्यासाठीही ही विशेष सीरीज आहे” असे पोलार्ड इंग्लंडला पराभूत केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला. इनसाइड स्पोर्टने हे वृत्त दिलं आहे.

India vs west indies for odi series Kieron Pollard west indies team arrivee in Ahmedabad

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.