IND VS WI: टीम इंडियावर कोरोनाचा हल्ला, आठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, बदलू शकतं सीरीजचं वेळापत्रक

भारत-वेस्ट इंडिजमध्ये (India vs West Indies) वनडे सीरीज सुरु होण्याआधी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाच्या चमूतील बहुतेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

IND VS WI:  टीम इंडियावर कोरोनाचा हल्ला, आठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, बदलू शकतं सीरीजचं वेळापत्रक
(PC-AFP)
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 10:05 PM

IND VS WI: भारत-वेस्ट इंडिजमध्ये (India vs West Indies) वनडे सीरीज सुरु होण्याआधी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाच्या चमूतील बहुतेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियातील आठ खेळाडूंना (Team India Players Covid-19 Positive) कोरोनाची लागण झाली आहे. यात सलामीवीर शिखर धवन, (Shikhar dhawan) ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. श्रेयस अय्यरही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. अन्य पाच खेळाडूंबद्दल अजून माहिती मिळालेली नाही. बीसीसीआयची मेडिकल टीम परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोरोनाची लागण झालेले खेळाडू वनडे सीरीजमधून बाहेर जाऊ शकतात. लवकरच बीसीसीआय नव्या खेळाडूंच्या नावाची घोषणा करु शकते.

सपोर्ट स्टाफमधल्या तिघांना कोरोना

या तीन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधल्या तिघांचे रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं कळतय. अहमदाबादेत पोहोचताच या खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार अजून काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याची शक्यता आहे.

स्टेडियमवर 75 टक्के प्रेक्षकांना परवानगी 

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ 3 टी-20 सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. हे सामने कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. या ठिकाणी सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम बंगाल सरकारने दिलेल्या माहितीनुसार स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा 75 टक्के प्रेक्षक हा सामना पाहू शकतात. यावेळी मात्र प्रेक्षकांना कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असेल.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 3-0 असा पराभव पत्करल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडिज विरोधात तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. हे सामने अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. या सामन्या दरम्यान प्रेक्षकांना परवानगी असणार नाही. हे तीन एकदिवस सामने 6, 9 आणि 11 फेब्रुवारी रोजी खेळवले जाणार आहेत. मात्र, आता भारतीय संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे या सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

india vs west indies odi series 8 indian players test positive for covid 19 shikhar dhawan shreyas iyer ruturaj gaikwad

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.