IND vs WI: धवनच्या व्हिडिओ मध्ये राहुल द्रविडची धमाकेदार एंट्री, हेड कोचचा दिसला वेगळा अंदाज, VIDEO व्हायरल
IND vs WI: टीम इंडियात (Team india) गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनचा (Shikhar Dhawan) विनोदी अंदाज सगळ्यांनाच ठावूक आहे. सोशल मीडियावर तो रील किंग आहे.
मुंबई: टीम इंडियात (Team india) गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनचा (Shikhar Dhawan) विनोदी अंदाज सगळ्यांनाच ठावूक आहे. सोशल मीडियावर तो रील किंग आहे. दरवेळी त्याचा कुठला ना कुठला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. कधी तो नाचताना दिसतो, तर कधी डायलॉगबाजी करताना दिसतो. यावेळी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर होतोय. त्याचं कारण तो नाही, तर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul dravid) आहेत. त्यांच्यामुळे फॅन्स हा व्हिडिओ शेयर करतायत. राहुल द्रविड शांत, संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच गंभीर भाव असतात. सोशल मीडियपासून ते अंतर राखूनच असतात. त्यामुळे राहुल द्रविड हे रील मध्ये दिसतील, असा कोणी विचारही केला नसेल. पण ही अशक्य भासणारी गोष्ट शिखर धवनने शक्य करुन दाखवली आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज मध्ये दाखल झालाय. वनडे सीरीजसाठी या संघाचं नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आलय. इथे दाखल होताच, शिखर धवनने एका व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेयर केलाय. ज्या मध्ये द्रविड यांचा एक थोडा वेगळा अंदाज पहायला मिळाला.
द्रविडला रील मध्ये पाहून लोकं हैराण
इन्स्टाग्रामवर सध्या ‘हे’ चॅलेंज भरपूर ट्रेंड होतय. धवनच्या व्हिडिओ मध्ये खेळाडू एकापाठोपाठ एक कॅमेऱ्यासमोर आले, व त्यांनी ‘हे’ म्हटलं. युजवेंद्र चहल, शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जाडेजा यांनी एकापाठोपाठ एक कॅमेऱ्यासमोर येऊन हाय म्हटलं. व्हिडिओत सर्वात शेवटी राहुल द्रविड आले व त्यांनी हाय केलं. याची अपेक्षा कोणीच केली नव्हती. फॅन्सना हा व्हिडिओ खूप आवडलाय. त्याला भरपूर लाइक्सही मिळालेत. व्हिडिओ मध्ये द्रविड यांना पाहून भारताचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने लिहिलय की, ‘अशा प्रकारचा स्टंट केवळ धवनच करु शकतो’ अभिनेता रणवीर सिंहने ‘हाहाहहा एक नंबर’ म्हटलं आहे. टीव्ही अभिनेता आणि शिखर धवनचा मित्र करण वाहीने ‘खरी मजा तर वॉलला पाहून आली’ अशी कमेंट केलीय. राहुल द्रविड यांना वॉल म्हटलं जातं.
View this post on Instagram
भारत वेस्ट इंडिज मध्ये किती वनडे खेळणार?
भारतीय संघ वेस्ट इंडिज मध्ये दाखल झाला आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.