IND vs WI: विराटने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कुट-कुट कुटलं, बॅटने टीकाकारांची तोंड केली बंद
Ind vs WI: मागच्या काही दिवसांपासून विराट कोहलीच्या (Virat kohli) फॉर्मवरुन सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. विराट कोहली धावांचा दुष्काळ कधी संपवणार? असं विचारल जात होतं.
कोलकाता: मागच्या काही दिवसांपासून विराट कोहलीच्या (Virat kohli) फॉर्मवरुन सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. विराट कोहली धावांचा दुष्काळ कधी संपवणार? असं विचारल जात होतं. अखेर आज विराटने या सर्व प्रश्नांना आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं, विराटने आज वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs West indies) दुसऱ्या टी 20 सामन्यात (T 20 match) शानदार अर्धशतक झळकावलं. 41 चेंडूत 52 धावांची खेळी करताना विराटने सात चौकार आणि एक षटकार लगावला. विराटच्या आजच्या फलंदाजीमध्ये जुन्या कोहलीची झलक पहायला मिळाली. 2019 पासून विराटने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक झळकवलेलं नाही. त्यामुळे त्याच्यावर सातत्याने टीका होत आहे. आज विराटने शतकी नाही, पण जी अर्धशतकी खेळी ती खरोखरच लाजबाव होती.
विराटच्या बॅटमधून बरसणाऱ्या धावा पाहून डोळ्याचं पारण फिटलं. विराटने आज सुरुवातीपासून गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. याआधी विराटने टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. विराटचं टी 20 क्रिकेटमधलं हे 30 व अर्धशतक आहे. जे त्याने षटकाराने पूर्ण केलं. 39 चेंडूत विराटने अर्धशतक पूर्ण केलं. भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजच्या या संघाविरुद्ध विराटचं हे पहिलं अर्धशतक आहे. वनडे सीरीजमध्ये विराट अपयशी ठरला होता.
Virat Kohli at it from the word go. Brings up a fine FIFTY off 39 deliveries ??
This is his 30th in T20Is.
Live – https://t.co/vJtANowUFr #INDvWI @Paytm pic.twitter.com/PNnX5zGXbS
— BCCI (@BCCI) February 18, 2022
अर्धशतकानंतर विराट आपली खेळी लांबवू शकला नाही. रॉस्टन चेसच्या 14 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. जेसन होल्डरने कॅच सोडल्यामुळे तो षटकार ठरला. त्यानंतर कोहली फारवेळ खेळपट्टीवर टिकला नाही. चेसच्या फ्लाईटेड चेंडूवर विराटने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू टर्न झाल्यामुळे विराट क्लीन बोल्ड झाला. विराटने आपल्या 52 धावांच्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला.
india vs west indies virat kohli played brilliant innings and scored half century in kolkata eden gardens stadium