IND Vs ZIM 1st ODI Match Live Streaming: कधी सुरु होणार सामना? जाणून घ्या पूर्ण शेड्यूल
IND Vs ZIM 1st ODI Match Live Streaming: वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आता झिम्बाब्वे मध्ये दाखल झाली आहे. यजमान देशाविरुद्ध तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळायची आहे.
मुंबई: वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आता झिम्बाब्वे मध्ये दाखल झाली आहे. यजमान देशाविरुद्ध तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळायची आहे. गुरुवारपासून ही मालिका सुरु होईल. तिन्ही सामने हरारे मध्ये खेळले जाणार आहेत. आशिया कप आधी ही मालिका, म्हणजे काही खेळाडूंसाठी पुनरागमनाची मोठी संधी आहे. टीमचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंतसारख्या मोठ्या खेळाडूंना या सीरीजसाठी आराम देण्यात आला आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताचा युवा संघ मैदानात उतरणार आहे. टीम मध्ये दिनेश कार्तिक आणि शिखर धवन सारखे काही अनुभवी खेळाडू सुद्धा आहेत.
कधी खेळली जाणार भारत-झिम्बाब्वे वनडे सीरीज?
भारत आणि झिम्बाब्वे मध्ये वनडे सीरीज 18 ऑगस्टला सुरु होईल. 22 ऑगस्टला ही मालिका संपेल.
कुठे खेळली जाणार भारत-झिम्बाब्वे वनडे सीरीज?
भारत- झिम्बाब्वे वनडे सीरीज मधले सगळे सामने हरारे मध्ये खेळले जाणार.
किती वाजता सुरु होणार सामना?
भारत आणि झिम्बाब्वे पहिली वनडे मॅच भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 12.45 वाजता सुरु होईल. टॉस 12.15 वाजता उडवला जाईल.
कुठे पाहू शकता भारत-झिम्बाब्वे वनडे सीरीजचं लाइव टेलीकास्ट?
भारत-झिम्बाब्वे वनडे सीरीजच लाइव टेलीकास्ट सोनी नेटवर्क स्पोर्ट्स वर पाहता येईल, तसंच डीडी स्पोर्ट्स वर सुद्धा लाइव ब्रॉडकास्ट केलं जाईल.
कुठे पाहू शकता भारत-झिम्बाब्वे वनडे सीरीजचं लाइव स्ट्रीमिंग?
भारत-झिम्बाब्वे वनडे सीरीजच लाइव स्ट्रीमिंग सोनी लिव वर पाहता येईल.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर