IND vs ZIM: वेस्ट इंडिज विरुद्ध हुकलेली संधी झिम्बाब्वेत साधली, Shubhaman Gill ची पहिली सेंच्युरी
IND vs ZIM: गिलने आपल्या करीयर मधील 20 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सेंच्युरी झळकावली. गिल आपल्या पहिल्या शतकाच्या जवळ पोहोचला होता, त्यावेळी 43 व्या षटकात इव्हान्सच्या (Evans) पहिल्या चेंडूवर तो अडचणीत सापडला होता.
मुंबई: भारताचा सलामीवीर शुभमन गिलने (Shubhaman Gill) आंतरराष्ट्रीय करीयरमधील आपलं पहिलं शतक झळकावलं आहे. झिम्बाब्वे विरुद्ध मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत (ODI) त्याने 82 चेंडूत शतक झळकावलं. गिलने आपल्या करीयर मधील 20 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सेंच्युरी झळकावली. गिल आपल्या पहिल्या शतकाच्या जवळ पोहोचला होता, त्यावेळी 43 व्या षटकात इव्हान्सच्या (Evans) पहिल्या चेंडूवर तो अडचणीत सापडला होता. त्याच्याविरोधात पायचीतच अपील करण्यात आलं होतं. पंचांनी हे अपील फेटाळलं. पण दुसऱ्याबाजूला इशान किशन रनआऊट झाला.
वेस्ट इंडिज विरुद्ध हुकलं होतं शतक
गिलने 2019 साली न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मॅचद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर पुढच्याचवर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलं. गिल मागच्या काही सामन्यांपासून शानदार फॉर्म मध्ये आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याचं शतक थोडक्यात हुकलं होतं. मागच्या महिन्यात पोर्ट ऑफ स्पेन मध्ये तो 98 धावांवर नाबाद राहिला. पावसामुळे या सामन्यात षटकं कमी करण्यात आली होती.
Shubman Gill scored a splendid 130 and is our Top Performer from the first innings ?
A look at his batting summary here ??#TeamIndia #ZIMvIND pic.twitter.com/Znz52wQjMo
— BCCI (@BCCI) August 22, 2022
शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवर बाद
वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीज मध्ये गिलने एकूण 205 धावा केल्या. झिम्बाब्वे विरुद्धही त्याचं शानदार प्रदर्शन कायम होतं. पहिल्या वनडेत शिखर धवन सोबत मिळून 10 विकेटने विजय मिळवला. पहिल्या सामन्यात गिलने नाबाद 82 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने 33 धावा केल्या. शुभमन गिल डावातील शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवर बाद झाला. इव्हान्सने त्याला कायाकरवी झेलबाद केलं. 97 चेंडूत त्याने 130 धावा फटकावताना 15 चौकार आणि 1 षटकार लगावला. भारताने झिम्बाब्वे समोर विजयासाठी 290 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.