IND vs ZIM T20 WC: सूर्यकुमार यादवने धोपटलं, झिम्बाब्वेला विजयासाठी दिलं मोठं लक्ष्य
IND vs ZIM T20 WC: सूर्यकुमार यादवशिवाय केएल राहुलही जबरदस्त खेळला.
मेलबर्न: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने आज टॉस जिंकून झिम्बाब्वे विरुद्ध पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे आजच्या सामन्यात पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवने आपल्या बॅटिंगचा करिष्मा दाखवला. त्याने 25 चेंडूत नाबाद 61 धावा फटकावल्या. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 4 षटकार लगावले. सूर्यकुमार यादवने आज टी 20 क्रिकेटमध्ये 1000 धावाही पूर्ण केल्या. सलामीवीर केएल राहुलने आज सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. राहुलने 35 चेंडूत 51 धावा फटकावल्या. यात 3 चौकार आणि 3 षटकार आहेत.
कोणी किती धावा केल्या?
रोहित शर्माने पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने 13 चेंडूत 15 धावा केल्या. विराट कोहलीने आज मोठी खेळी करु शकला नाही. त्याने 25 चेंडूत 26 धावा केल्या. ऋषभ पंत आज मिळालेल्या संधीचा फायदा उचलू शकला नाही. फक्त 3 रन्सवर तो आऊट झाला. हार्दिक पंड्या 18 चेंडूत 18 धावांवर आऊट झाला. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 186 धावा केल्या. झिम्बाब्वेला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य दिले आहे.
सेमीफायनलमध्ये भारताचा सामना कोणाबरोबर?
न्यूझीलंड, इंग्लंडनंतर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचणारी तिसरी टीम ठरली आहे. टीम इंडियाने आज झिम्बाब्वेला हरवल्यास इंग्लंडबरोबर सेमीफायनलमध्ये सामना होऊ शकतो. ग्रुप 1 मधील टॉप टीम ग्रुप 2 मधील दुसऱ्या स्थानावरील टीम बरोबर आणि ग्रुप 2 मधील टॉप टीम ग्रुप 1 मधील दुसऱ्या स्थानावरील टीम बरोबर खेळणार आहे.
भारत: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार,