IND Vs ZIM 3rd ODI Live Cricket Score: भारताचा झिम्बाब्वेवर 13 धावांनी विजय, 276 धावांवर झिम्बाब्वेचा संघ गारद

| Updated on: Aug 26, 2022 | 1:37 PM

India Vs Zimbabwe 3rd Match Live Updates: भारताकडे 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी आहे. आज क्लीन स्वीपचा प्रयत्न असेल.

IND Vs ZIM 3rd ODI Live Cricket Score: भारताचा झिम्बाब्वेवर 13 धावांनी विजय, 276 धावांवर झिम्बाब्वेचा संघ गारद
ind vs zim

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे मधील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील आज शेवटचा सामना आहे. भारताने मालिका आधीच जिंकली आहे. भारताकडे 2-0 अशी विजयी आघाडी आहे. आजचा सामना जिंकून मालिकेत 3-0 क्लीन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. झिम्बाब्वे आजचा सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 22 Aug 2022 09:28 PM (IST)

    भारताकडून झिम्बाब्वेला क्लीन स्वीप, शुभमन गिलचं शानदार शकत, झिम्बॉब्वेचा 13 धावांनी पराभव

    भारतीय क्रिकेट संघाने झिम्बॉब्वे विरोधीतल तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना जिंकलाय. भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल याने करिअरमधील पहिलं शतक झळकावलं. त्या जोरावर भारताने प्रतिस्पर्धी संघासमोर 289 धावांचं आव्हान उभं केलं होतं. झिम्बॉब्वेकडूनही सिकंदर रजाने शानदार शतक झळकावत आपल्या देशवासियांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र गिलने रजाचा कॅच घेत त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. भारताने 50 षटकांत 8 बाद 289 धावा केल्या. तर झिम्बॉब्वेने 49.3 षटकांत 10 विकेट गमावून 276 धावांपर्यंत मजल मारली.

  • 22 Aug 2022 08:29 PM (IST)

    महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर; सुनावणी कधी होणार यावर प्रश्नचिन्ह

    शिंदे आणि सेना गटाच्या अस्तित्वाचा फैसला पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे   महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर पडल्याचे दिसत आहे.  सुनावणीसाठी येणाऱ्या उद्याच्या प्रकरणात राज्यातील या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाचा समावेश नाही. यामुळे सुनावणी कधी होणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.  उद्या सुनावणी होणार की नाही याबाबत देखील स्पष्टता नाही.

  • 22 Aug 2022 06:58 PM (IST)

    झिम्बाब्वेचा कॅप्टन पॅव्हेलियनमध्ये

    झिम्बाब्वेला चौथा झटका बसला आहे. कॅप्टन चाकाब्वाला अक्षर पटेलने आपल्याच गोलंदाजीवर 16 धावांवर झेलबाद केलं. 27 षटकानंतर झिम्बाब्वेच्या 4 बाद 122 धावा झाल्या आहेत.

  • 22 Aug 2022 06:41 PM (IST)

    मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत

    मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.  नेरळ आणि भिवपुरी रेल्वे स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. मालगाडीच्या मागे कर्जतकडे जाणाऱ्या दोन लोकल अडकल्या आहेत. कर्जतहून दुसरं इंजिन येऊन मालगाडीला पुढे नेण्यात येत आहे.

  • 22 Aug 2022 06:29 PM (IST)

    झिम्बाब्वेला दोन झटके

    18 षटकानंतर झिम्बाब्वेच्या 3 बाद 84 धावा झाल्या आहेत. चांगली फलंदाजी करणाऱ्या सीन विलियम्सला अक्षर पटेलने 45 धावांवर पायचीत पकडलं. त्यानंतर आणखी दोन धावांनी टोनी मुनयोंगा 15 धावांवर आऊट झाला. आवेश खानने त्याला केएल राहुलकरवी झेलबाद केलं.

  • 22 Aug 2022 06:03 PM (IST)

    करुणा मुंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    करुणा मुंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आल्या आहेतय.  विधानभवनातील CM कार्यालयात त्यांची ही भेट होत आहे. मध्यंतरीच्या काळात करुणा मुंडेंवर दाखल झालेल्या खटल्यांप्रकरणी त्या मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत.

  • 22 Aug 2022 05:57 PM (IST)

    झिम्बाब्वेने ओलांडला 50 धावांचा टप्पा

    भारताच्या 290 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 12 ओव्हर्स नंतर झिम्बाब्वेच्या 1 बाद 56 धावा झाल्या आहेत. काइटानो दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन 12 धावांवर पॅव्हेलियन मध्ये परतला. इनोसेंट कायला 6 धावांवर दीपक चाहरने पायचीत पकडलं.

  • 22 Aug 2022 04:26 PM (IST)

    झिम्बाब्वे समोर विजयासाठी 290 धावांचे लक्ष्य

    शुभमन गिलच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर (130) भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 290 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.

  • 22 Aug 2022 03:47 PM (IST)

    शुभमन गिलने झळकावली शानदार सेंच्युरी

    झिम्बाब्वे विरुद्ध तिसऱ्या वनडेत शुभमन गिलने शानदार सेंच्युरी झळकवली. 82 चेंडूत त्याने नाबाद 100 धावा फटकावल्या. यात त्याने 12 चौकार लगावले.

  • 22 Aug 2022 03:46 PM (IST)

    इशान किशन रनआऊट

    43 षटकानंतर भारताच्या 2 बाद 227 धावा झाल्या आहेत. इशान किशन अर्धशतक झळकावल्यानंतर 50 धावांवर रनआऊट झाला.

  • 22 Aug 2022 03:02 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांवर कुणाचा तरी दबाव : पृथ्वीराज चव्हाण

    मुख्यमंत्र्यांवर कुणाचा तरी दबाव आहे – पृथ्वीराज चव्हाण

    कुणीतरी बँक सीटवरून ड्रायव्हिंग करतंय

    पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला

  • 22 Aug 2022 03:01 PM (IST)

    शुभमन गिल-इशान किशनची जोडी मैदानात

    29 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. भारताच्या 2 बाद 126 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 40 आणि इशान किशन 10 धावांवर खेळतोय.

  • 22 Aug 2022 02:37 PM (IST)

    भारत 100 धावांच्या पुढे

    इशान किशन-शुभमन गिलची जोडी जमली असून भारताने 100 धावांचा टप्पा पार केला आहे. 26.1 षटकात भारताच्या 2 बाद 110 धावा झाल्या आहेत. धवन 40 धावांवर आऊट झाला. आता शुभमन गिल-इशान किशनची जोडी मैदानात आहे.

  • 22 Aug 2022 02:00 PM (IST)

    केएल राहुल बाद

    16 षटकानंतर भारताच्या 1 बाद 65 धावा झाल्या आहेत. कॅप्टन केएल राहुल 30 धावांवर इव्हान्सच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्याने 46 चेंडूत 30 धावा केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार आहे. आता शिखर धवन आणि शुभमन गिलची जोडी मैदानात आहे.

  • 22 Aug 2022 01:31 PM (IST)

    भारताची चांगली सुरुवात

    10 षटकानंतर भारताच्या बिनबाद 41 धावा झाल्या आहेत. शिखर धवन 25, केएल राहुल 12 धावांवर खेळतोय.

  • 22 Aug 2022 01:01 PM (IST)

    तिसऱ्या वनडे सामन्याला सुरुवात

    तिसऱ्या वनडे सामन्याला सुरुवात झाली आहे. तीन षटकात भारताच्या बिनबाद 16 धावा झाल्या आहेत. केएल राहुल आणि शिखर धवन ही सलामीची जोडी मैदानात आहे.

  • 22 Aug 2022 12:59 PM (IST)

    IND vs ZIM Live Score: अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग-11

    टीम इंडियाची प्लेइंग-11: केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, संजू सैमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, आवेश खान.

  • 22 Aug 2022 12:58 PM (IST)

    IND vs ZIM Live Score: भारताने टॉस जिंकला

    भारतीय कॅप्टन केएल राहुलने तिसऱ्या वनडेत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलने सलग तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकला आहे. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाला बाहेर बसवलं आहे. त्यांच्याजागी दीपक चाहर आणि आवेश खानला संधी दिली आहे.

Published On - Aug 22,2022 12:56 PM

Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.