VIDEO: भारतीय महिला क्रिकेटपटू स्पॅनिश गाण्यावर थिरकल्या, स्मृती व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
भारतीय महिला क्रिकेट संघ नुकताच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सर्व प्रकारचे क्रिकेट सामने खेळला. यावेळी टी20 आणि वन-डे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकला. तर एकमेव कसोटी सामना अनिर्णीत सुटला.
मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाने अलीकडच्या दिवसांत आपला खेळ कमालीचा सुधारला आहे. तगड्या देशांना चुरशीची टक्कर देत भारतीय महिला गोलंदाजी, फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही नवे झेंडे गाडत आहेत. अशावेळी मजा-मस्तीमध्येही संघ मागे नसून संघातील युवा खेळाडू सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. यामध्ये जेमिमा रोड्रिगेजसह स्मृती मंधाना अशा काही खेळाडूंचा समावेश आहे.
दरम्यान स्मृती मंधाना हीने नुकताच एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यामध्ये तिच्या सहखेळाडूंसोबत एक प्रसिद्ध अशा इंग्रजी गाण्यावर थिरकत आहे. या व्हिडीओमध्ये स्मृतीसह इतर सहकारी खेळाडूंत हरमनप्रीत कौर, जेमिमा रोड्रिगेज, राधा यादव यांचा समावेश आहे. हे सर्वजण सध्या फार प्रसिद्ध होत असलेलं इन दा घेटो या स्पॅनिश गाण्यावर नाचत आहेत. यामध्ये सर्वच महिला खेळाडू अगदी मजा-मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडीओला शेअर करताना खास कॅप्शनमध्ये स्मृतीने मजेशीररित्या लिहिलं आहे की,’मला यावरुन जज करु नका मला हे जबरदस्तीने करायला लावलं आहे.’
View this post on Instagram
असा पार पडला ऑस्ट्रेलियाचा दौरा
21 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने, तीन टी20 सामने आणि एक कसोटी सामना पार पडला. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रलिया संघाने 9 आणि 5 विकेट्सने विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात भारताने 3 विकेट्सनी विजय मिळवला असला तरी मालिका मात्र ऑस्ट्रेलिया संघाने 2-1 ने खिशात घातली. ज्यानंतर एकमेव कसोटी सामना अनिर्णीत सुटला. त्यानंतर पहिला टी20 सामनाही अनिर्णीत सुटला. पण दुसऱ्या सामन्यात 4 विकेट्सनी आणि तिसऱ्या सामन्यात 14 धावांनी विजय मिळवत मालिका ऑस्ट्रेलिया संघाने 2-0 ने खिशात घातली.
हे ही वाचा
अक्षर पटेल मुख्य संघातून राखीव खेळाडूंमध्ये जाण्यामागे हार्दीक पंड्या, वाचा नेमकं प्रकरण काय?
T20 World Cup साठी भारतीय संघाची रणनीती ठरली, अशी असेल टीम इंडिया, काय म्हणाले रवी शास्त्री?
(India Women Cricketers including smriti mandhana jemimah and harmanpreet shares dance video on Song in da ghetto)