IND vs AUS : 26 वनडे सामन्यांपासूनचा ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखण्यात भारतीय संघ यशस्वी, झुलन, शेफाली, स्नेह राणा चमकल्या

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या महिला क्रिकेट संघानेही एकदिवसीय मालिका अखेरच्या सामन्यात विजय मिळवत संपवली आहे.

IND vs AUS : 26 वनडे सामन्यांपासूनचा ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखण्यात भारतीय संघ यशस्वी, झुलन, शेफाली, स्नेह राणा चमकल्या
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 3:41 PM

मुंबई : असे म्हटले जाते की जर शेवट चांगला असेल तर सर्व काही ठीक आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या महिला क्रिकेट संघानेही एकदिवसीय मालिका अखेरच्या सामन्यात विजय मिळवत संपवली. मात्र, 1-2 ने पिछाडीवर पडल्यामुळे संघाला 3 वनडे सामन्यांची ही मालिका काबीज करता आली नाही. पण या मालिकेत भारतीय महिला संघाने एक महान काम केले आहे. त्यांनी गेल्या 26 एकदिवसीय सामन्यांपासून ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची विजयी मालिका खंडित केली आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाचा विजयरथ रोखल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. (India Women End Australia Women’s 26-Match ODI Winning Streak With 2-Wicket Win)

एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने गमावलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम गोलंदाजी केली. प्रथम खेळताना यजमानांनी 9 फलंदाजांच्या बदल्यात 264 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने रसेल आणि लेनिंगला लवकर पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

100 धावांच्या आत ऑस्ट्रेलियन टॉप ऑर्डरचे चार बॅटर्स माघारी परतले. ज्यात एलिसा हिली आणि एलिस पेरी सारख्या फलंदाजांची नावे आहेत. मात्र, यानंतर मुने आणि गार्डनर या दोघींनी ऑस्ट्रेलियाचा कोसळणारा डाव सावरला. दोघाींमध्ये झालेली भागीदारी भारतासाठी धोकादायक ठरत होती. ही भागीदारी फोडण्याचे काम स्नेह राणाने केले. तिने 52 या वैयक्तिक धावसंख्येवर असलेल्या मुनेला त्रिफळाचित केलं. त्यानंतर गार्डनरही पूजाचा बळी ठरली, तिने 67 धावा केल्या. अखेरच्या षटकात फटकेबाजी करुन मॅक्ग्राने 32 चेंडूत 47 धावा केल्या. या सामन्यात झुलन गोस्वामी भारतासाठी सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरली, तिने 10 षटकांत 37 धावा देऊन 3 बळी घेतले.

2 विकेट राखून जिंकला शेवटचा एकदिवसीय सामना

265 धावांचे लक्ष्य घेऊन भारतीय सलामीवीर मैदानात उतरल्या. पहिल्या विकेटसाठी सलामीवीरांनी 50 धावांची भागीदारी केलीच होती, तोच स्मृती मांधना बाद झाली. तिच्यानंतर आलेल्या यास्तिका भाटियाने शेफालीला सोबत घेऊन मोर्चा सांभाळला. दोघाींमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. 56 धावा करणारी शेफाली बाद झाल्याने ही जोडी फुटली. यास्तिका भाटियाने 69 चेंडूत 64 धावा केल्या. तथापि, 180 धावांवर दोन सेट फलंदाज बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. तेव्हा दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांनी भारताचा डाव पुन्हा रुळावर आणण्याचे काम केले. दीप्तीने 30 चेंडूत 31 धावा केल्या तर स्नेह राणाने 27 चेंडूत 30 धावा केल्या.

भारताला विजयासाठी शेवटच्या 4 चेंडूत 3 धावांची गरज होती. पण झुलन गोस्वामीने एक सणसणीत चौकार मारला आणि सामना 3 चेंडू आधीच 2 गडी राखून जिंकला. झुलन गोस्वामी भारताच्या या विजयाची हिरो ठरली, त्यामुळे तिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराना गौरवण्यात आले.

इतर बातम्या

रवीचंद्रन अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी, ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला!

माझ्या भावाने विराट कोहलीविरुद्ध स्क्रिप्ट लिहिली, धोनीची मोठी प्रतिक्रिया

IPL 2021 Purple Cap: हर्षल पटेल अव्वल स्थानी कायम, अशी आहे नवी यादी

(India Women End Australia Women’s 26-Match ODI Winning Streak With 2-Wicket Win)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.