Video: सूर्यकुमार यादवच्या कॅचमुळे टीम इंडियाचा विजय, महत्त्वाच्या क्षणी पकडला अफलातून झेल

भारताने 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना न गमवता जेतेपदावर नाव कोरलं आहे. तसेच प्रशिक्षक राहुल द्रविड याला हॅप्पी सेंड ऑफ दिला आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने पकडलेला झेल टर्निंग पॉइंट ठरला.

Video: सूर्यकुमार यादवच्या कॅचमुळे टीम इंडियाचा विजय, महत्त्वाच्या क्षणी पकडला अफलातून झेल
Image Credit source: video grab
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 11:52 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद अखेर टीम इंडियाने मिळवलं आहे. गेला महिनाभर जेतेपदासाठी टीम इंडियाची धडपड सुरु होती. जेतेपदावर नाव कोरणार की नाही याची उत्सुकता लागून होती. अखेर टीम इंडियाने जेतेपदावर नावर कोरत 11 वर्षांपासून असलेला जेतेपदाचा दुष्काळ दूर केला आहे. टीम इंडियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 20 षटकात 7 गडी गमवून 176 धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ फक्त 169 धावा करू शकला आणि भारताने 7 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने पकडलेला झेल टर्निंग पॉइंट ठरला. 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर डेविड मिलरने उत्तुंग षटकार मारला. मात्र सीमेवर असलेल्या सूर्यकुमार यादवने काहीच चूक केली नाही आणि जबरदस्त झेल पकडला.

सूर्यकुमार यादवने हा झेल पकडण्यास थोडी जरी चूक केली असती तर वर्ल्डकपचं स्वप्न भंगलं असतं. मात्र सूर्या है तो मुमकीन है असंच म्हणावं लागेल. हार्दिक पांड्याने पहिलाच चेंडू वाइड फूलटॉस टाकला. यावेळी डेविड मिलर चुकला आणि चेंडू खूपच वर चढला. असं वाटलं की हा आता षटकारच जातो. पण सूर्या त्या चेंडूखाली आला आणि पकडला. सीमेला पाय लागायचा आधीच चेंडू मधे फेकला आणि पुन्हा झेल पकडला. या झेलमुळे सर्व सामनाच भारताच्या पारड्यात झुकला.

डेविड मिलर बाद झाल्यानंतर 5 चेंडूत 16 धावा करेल असा कोणी फलंदाज नव्हता. अखेर दक्षिण अफ्रिकेवर असलेला चोकर्सचा ठपका कायम राहीला. उर्वरित 5 चेंडूत फक्त 8 धावा करता आल्या. टीम इंडियाने हा सामना 7 धावांनी जिंकत दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप चषकावर नाव कोरलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.