Photo : 5 वर्ष संघातून बाहेर, इंग्लंड दौऱ्यात पुनरागमन, अष्टपैलू खेळी करत जिंकली सर्वांचीच मनं
भारतीय पुरुष संघाप्रमाणे महिला संघही सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. एकमेव कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही इंग्लंडच्या संघाने जिंकली. मात्र अखेरच्या सामन्यात भारताने अप्रतिम विजय मिळवत 3 पैकी 1 सामना मात्र आपल्या नावे केला.
1 / 5
भारतीय महिला क्रिकेट संघाने शेवटच्या वनडेमध्ये इंग्लंडला चार विकेटने मात देत मालिकेचा शेवट गोड केला. कर्णधार मिताली राजच्या (Mithali Raj) नाबाद 75 धावांच्या जोरावर मिळवलेल्या या विजयात खालच्याफळीतील एका अष्टपैलू फलंदाजाने चांगले योगदान दिले. या खेळाडूचे नाव स्नेह राणा (Sneh Rana) असून सातव्या स्थानावर येत तिने 22 चेंडूत 24 धावा केल्या ज्यामुळे भारत सामना फिनिश करु शकला.
2 / 5
विशेष म्हणजे 27 वर्षीय स्नेह राणाने इंग्लंड दौऱ्यावर येत असताना तब्बल 5 वर्षानंतर पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले.
याआधी ती 2016 मध्ये भारतीय संघातून खेळली होती. पण स्थानिक क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे तिला पुन्हा संघात स्थान दिले गेले आहे.
3 / 5
सामन्यानंतर मिताली राजने स्नेहचे कौतुक केले. ती म्हणाली, 'स्नेह राणालाही विजयाचे श्रेय देणे गरजेचे आहे. कारण तिने केलेली 24 धावांची खेळी सामन्यात महत्त्वाची ठरली.
कारण ती ज्या स्थानावर खेळते तिथे आम्ही असाच खेळाडू बघतो जो मोठे शॉट खेळेल आणि सोबत गोलंदाजीतही कमाल करेल. स्नेहने अशीच खेळी केल्यास पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी तिला संघात स्थान मिळू शकते.'
4 / 5
इंग्लंडविरुद्ध भारतीय महिला खेळलेल्या एकमेव टेस्टमध्येही स्नेहने चांगली कामगिरी केली. तिने 82 धावांसह 4 विकेटही पटकावल्या. भारताच्या दुसऱ्या डावात स्नेहच्या नाबाद 80 धावा सामना अनिर्णीत कऱण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या.
5 / 5
स्नेहने इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सामन्यादरम्यान नुकत्याच निधन झालेल्या वडिलांबद्दल बोलताना ती भावुक झाली होती. ती म्हणाली, 'काही महिन्यांपूर्वीच माझ्या वडिलांचे निधन झाले. संघाची घोषणा होण्याआधीच मी त्यांना गमावला.
त्यांना मला भारताकडून खेळताना पाहायचे होते. पण मी यापुढे जीही कामगिरी करेन ती त्यांनाच समर्पित असेल.' स्नेहने आतापर्यंत भारतीय संघाकडून एक टेस्ट, 9 वनडे आणि 5 टी-20
सामने खेळले आहेत. ज्यात तिने 14 विकेट आणि 159 रन्स केले आहेत.