IND vs ENG : 24 तासांच्या खेळात सिराजची इंग्लंडच्या खेळाडूंशी दुसऱ्यांदा वादावादी, कोहलीच्या मध्यस्थीनंतर सिराज शांत, VIDEO

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना नॉटिंगहॅम येथे खेळवला जात आहे. अत्यंत रंगतदार स्थितीत असणाऱ्या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये चूरस दिसून येत आहे.

IND vs ENG : 24 तासांच्या खेळात सिराजची इंग्लंडच्या खेळाडूंशी दुसऱ्यांदा वादावादी, कोहलीच्या मध्यस्थीनंतर सिराज शांत, VIDEO
मोहम्मद सिराज
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 1:35 PM

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंगहॅम येथे खेळवला जात आहे. सामना अत्यंत रंगतदार स्थितीत असून भारत विजयाच्या जवळ पोहचला आहे. भारताने इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांमध्ये गुंडाळला. पहिल्या डावातील भारताच्या 95 धावांच्या आघाडीमुळे भारताला सामना जिंकण्यासाठी 209 धावांचेच लक्ष्य होते. त्यातील 52 धावा भारताने केल्यामुळे विजयासाठी आता केवळ भारताला 157 धावांचे लक्ष्य आहे. सोबतच हातात 9 विकेटही आहेत. आता हा झाला सामन्याचा लेखाजोखा पण मैदानात क्रिकेट खेळण्यासोबत दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये गरमागर्मीचं वातावरणंही दिसून येत आहे. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) चांगलाच जोशात दिसत आहे. त्याने 24 तासांच्या खेळात दोन इंग्लंडच्या खेळाडूंशी वाद घातला आहे.

मोहम्मद सिराज भारताचा नवखा पण तगडा गोलंदाज आहे. मागील काही काळांत उदयास आलेल्या वेगवान गोलंदाजाच्या यादीतील एक नाव असणाऱ्या सिराजने मागील काही कसोटी सामन्यात चांगली गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियामध्येही एका डावात 5 विकेट घेणारा सिराज इंग्लंड दौऱ्यातही चांगल्या लयीत आहे.

सॅम करन vs मोहम्मद सिराज

चौथ्या दिवशीचा जेव्हा इंग्लंडचा संघा दुसऱ्या डावातील 74 वी ओव्हर खेळत होता. त्यावेळी सिराज आणि त्याच्यात काहीसं वातावरण तापलेलं दिसून आलं. सध्याच्या काळात क्रिकेटच्या मैदानात होणारी ही वादावादीपुन्हा एकदा दिसून आली. सिराज सॅम करनला गोलंदाजी करत होता दुसरीकडे जो रुट शतकाच्या अगदी जवळ होता आणि इंग्लंडच्या हातात 4 विकेट देखील होते. त्यावेळी सिराज सॅमला बाद करण्यासाठी बाऊन्सरचा मारा करत होता. त्याचवेळी तो त्याच्याशी काहीतरी बोलला देखील जे साधे बोलणे नसून एका वादाप्रमाणे वाटतं होते. अखेर ओव्हरच्या अखेरीस विराटला मध्ये पडून सिरादला शांत करावे लागले.

24 तासांपूर्वीच सिराजचा अँडरसनशी वाद

सॅम आणि सिराज यांच्यातील वादाआधीच 24 तासांपूर्वी सिराजचा इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनसोबत वाद झाला होता. त्यावेळी मात्र सिराज फलंदाजी करत होता आणि अँडरसन गोलंदाजी. या दरम्यान अँडरसनने सिराजला धक्का दिल्याचे दिसून आले होते.

संबंधित बातम्या

विराट कोहलीचा धुरंदर, 46 चेंडूत ठोकलं शतक, नंतर दारुच्या नशेत संपवलं करीयर

IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीलाच विराट पराभूत, ‘या’ गोष्टी सर्वाधिक पराभवाचा रेकॉर्ड नावावर

(Indian Bowler Mohammad Siraj fight with james anderson and sam curran in india vs england first test)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.