IND vs SL : श्रीलंकेविरुद्ध विजयासह शिखरने गाठले रेकॉर्ड्सचे ‘शिखर’, एकाच सामन्यात अनेक विक्रम

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत कर्णधार शिखर धवनने विजयी सामन्याने आपल्या कर्णधारपदाची सुरुवात केली आहे.

IND vs SL : श्रीलंकेविरुद्ध विजयासह शिखरने गाठले रेकॉर्ड्सचे 'शिखर', एकाच सामन्यात अनेक विक्रम
Shikhar Dhawanशिखर धवन
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 10:35 AM

कोलंबो : भारतीय गोलंदाजाची दिलासादायक गोलंदाजी आणि फलंदाजीत इशान, पृथ्वी शॉच्या फटकेबाजीसह कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) संयमी खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर तब्बल 7 विकेट्सने दमदरा विजय मिळवला आहे. कर्णधार शिखरने सामन्यात नाबाद 86 धावा करत विजयासह आपल्या कर्णधारपदाचा श्रीगणेशा करत अनेक रेकॉर्डही आपल्या नावे केले आहेत.

सर्वांत आधी मैदानात कर्णधार म्हणून पाय ठेवताच शिखर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वयात कर्णधारपद स्वीकारणारा खेळाडू ठरला. धवनने 35 वर्ष 225 दिवसांचा असताना कर्णधारपदाचा भार स्वीकारला. याआधी मोहिंदर अमरनाथ यांनी 1984 मध्ये 34 वर्ष 37 दिवसांचे असताना कर्णधारपद भूषवत हा रेकॉर्ड केला होता जो शिखरने तोडला आहे.

आंतरराष्ट्रीय 10000 धावांचा टप्पा पूर्ण

शिखरने फलंदाजी करताना संयमी 86 धावांची खेळी करत संघाला विजयापर्यंत घेऊन गेला. या धावांसोबतच त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय  सामन्यात 6 हजारन धावा पूर्ण केल्या. यासोबतच शिखर विराट कोहलीनंतर सर्वात जलदगतीने हा टप्पा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला. त्याने 140 सामन्यांत ही कामगिरी केली. वऩ़डे सोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही 10 हजार धावांचा टप्पा शिखरने गाठला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्य़े सलामीवीर म्हणून 10 हजार रन पूर्ण करणारा तो पाचवा खेळाडू ठरला आहे. यासोबतच शिखर श्रीलंका संघाविरुद्ध सर्वात जलदगतीने 1 हजार एकदिवसीय धावा पूर्ण करणारा खेळा़डूही ठरला आहे . त्याने केवळ 17 डावांत हा रेकॉर्ड केला आहे. याआदी दक्षिण आफ्रीकेच्या हाशिम अमला (18 डावांत) याच्या नावावर हा रेकॉर्ड होता.

हे ही वाचा :

‘ठरवूनच गेलो होतो, कुणीही असो, पहिल्या बॉलवर षटकारच मारायचा’, चहलच्या मुलाखतीत इशानची सिक्रेट गोष्ट

पृथ्वीचा लंकेला तडाखा, धमाकेदार खेळीनंतर सेहवागचं ‘ते’ ट्विट व्हायरल, रवी शास्त्रींची घेतली मजा!

टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी, भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय

(Indian Captain Shikhar Dhawan sets many records with win in First ODI Match Against Sri Lanka)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.