IND vs ENG : इंग्लंडमध्ये विराटसह भारताच्या तीन खेळाडूंना दुखापत, सराव सामन्यातूनही माघार

भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच ऋषभ पंत कोरोनाची बाधा झाल्यामुळे सराव सामन्याला अनुपस्थित असतानाच आणकी तीन खेळाडूंनाही दुखापत झाली आहे.

IND vs ENG : इंग्लंडमध्ये विराटसह भारताच्या तीन खेळाडूंना दुखापत, सराव सामन्यातूनही माघार
भारतीय संघ
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 8:51 PM

लंडन : इंग्लंडच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील (Indian Team) तीन खेळाडूंना दुखापत झाली आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) यांचा समावेश आहे. कोहलीला पाठीचा त्रास होत असून रहाणेच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. यामुळे हे दोघेही इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी सेलेक्ट XI संघासोबतच्या सराव सामन्यालाही हुकले आहेत. तर आवेश खान याला काउंटी सेलेक्ट XI संघाकडून भारतविरुद्ध खेळताना बोटाला दुखापत झाली आहे.

बीसीसीआयने कर्णधार कोहली आणि रहाणे यांना दुखापत झाल्याची माहिती दिली. या माहितीनुसार कोहलीला सोमवारी रात्री पाठीचा त्रास सुरु झाला. ज्यामुळे तो सध्या विश्रांती घेत आहे. तर रहाणेच्या डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगमध्ये थोडी सूज आली आहे. ज्यामुळे त्याने इंजेक्शन घेतले असून तो ही विश्रांती घेत आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे तत्पूर्वी हे दोघेही ठिक होतील अशी आशा केली जात आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

हे ही वाचा

विराटला निवृत्तीनंतर मिळणारी ‘ही’ गोष्ट आताच मिळाली, कोहलीबाबत युवराज सिंगने केलं मोठ वक्तव्य

CSXI vs IND, Other Test Live Streaming: विराटची टोळी खेळणार पहिला सराव सामना, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन

(Indian Captain Virat kohli ajinkya rahane avesh khan injured befored India vs County xi Practice match)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.