टीम इंडियाच्या ‘या’ बॅट्समनचं स्थान धोक्यात?, विराट कोहलीने इशाऱ्या इशाऱ्यात सांगितलं!
कर्णधार विराट कोहलीचा रोष होता तो मधल्या फळीतील बॅट्समन चेतेश्वर पुजारावर... जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्या पुजाराने निराशा केली. (Indian Captain Virat kohli Slam Cheteshwar pujara WTC Final 2021)
मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यापर्यंतचा (WTC Final 2021) भारताचा प्रवास मोठ्या कष्टाने झाला होता. विश्वविजेता बनण्याची संधी केवळ एक पाऊल दूर होती. मात्र अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंना त्यांच्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलं. परिणामी किवी संघाने भारताला 8 विकेट्सने लोळवून 144 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची गदा पटकावली. केन विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने दिमाखदार विजय मिळवला. भारताच्या पराभवानंतर आता खेळाडूंचं कुठे चुकलं? याची चर्चा होत असताना सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडताना संघातील सिनिअर खेळाडूला इशारा दिला. (Indian Captain Virat kohli Slam Cheteshwar Pujara WTC Final 2021)
विराटचा पुजाराला इशारा!
कर्णधार विराट कोहलीचा रोष होता तो मधल्या फळीतील बॅट्समन चेतेश्वर पुजारावर… जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्या पुजाराने निराशा केली. त्याचा आऊट ऑफ फॉर्म चर्चेचा विषय बनला. फलंदाजांच्या उणीवांबद्दल बोलताना विराटचा रोख खासकरुन पुजारावर राहिला. काही खेळाडूंची रन्स करण्याची तयारी नाहीय, आम्हाला संघात काही बदल करावे लागतील, असं म्हणत त्याने चेतेश्वर पुजारा इशारा दिला. विराटच्या इशाऱ्यानंतर चेतेश्वर पुजाराचं स्थान धोक्यात आलंय, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे.
विराट नेमकं काय म्हणाला?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधल्या पराभवानंतर आम्ही आत्ममंथन करणार आहोत. संघाला आणखी मजबूत करण्यासाठी काय करावं लागेल, याचा विचार आम्ही करणार आहोत. आम्ही वर्षभर वाट न पाहता लवकरच योग्य निर्णय घेऊन मर्यादित षटकांतील भारतीय संघाप्रमाणे कसोटी संघ करणार आहोत, असं सांगताना विराटने संघातील बदलाचीही तयारी दर्शवली. विराटचा हा इशारा पुजाराबद्दलच होता, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.
पुजाराचं खराब प्रदर्शन
पुजाराची बॅट मागील काही काळापासून बोलत नाहीय. त्याच्या बॅटमधून शतक निघालेलं जवळपास दोन वर्ष उटलून गेलीत. 2018 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या बॅटमधून शतक आलं होतं. त्याचा हाच आऊट ऑफ फॉर्म अंतिम सामन्यातही पाहायला मिळाला. पहिल्या डावात 54 बॉल्समध्ये त्याने केवळ 8 धावा केल्या. पहिली धाव घेण्यासाठी पुजाराने 35 चेंडू घेतले. तर दुसऱ्या डावात 80 बॉल्समध्ये 15 धावाच केल्या. संघाला आधाराची गरज असताना पुजारा झेल देऊन बाद झाला.
(Indian Captain Virat kohli Slam Cheteshwar pujara WTC Final 2021)
हे ही वाचा :