विराट कोहलीच्या फलंदाजीत ‘या’ ठिकाणी होतेय चूक, माजी दिग्गज क्रिकेटपटूची प्रतिक्रिया, चौथ्या कसोटीत सुधारणा आवश्यक

विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत सुमार फलंदाजी केली आहे. त्याने 3 सामन्यात 5 डावांमध्ये 24.80 च्या सरासरीने 124 धावाच केल्या असून यात केवळ एक अर्धशतक आहे.

विराट कोहलीच्या फलंदाजीत 'या' ठिकाणी होतेय चूक, माजी दिग्गज क्रिकेटपटूची प्रतिक्रिया, चौथ्या कसोटीत सुधारणा आवश्यक
विराट कोहली
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 3:44 PM

लंडन : इंग्लंडमध्ये (England) सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli) प्रदर्शन फारच सुमार सुरु आहे. तो फलंदाजीमध्ये हवा तसा सुधार आणत नसल्याने त्याला शतकतर दूर अर्धशतकासाठीही फार मेहनत करावी लागत आहे. त्याने 5 कसोटी मालिकेतील 3 सामन्यात 5 डावांमध्ये 24.80 च्या सरासरीने 124 रन केले आहेत. त्यात केवळ एकच अर्धशतकाचा समावेश आहे. दरम्यान त्याच्या या फलंदाजीतील खराब फॉर्मचं कारण माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने (Irfan Pathan) सांगितलं आहे.

इरफान पठाणने सांगितलं की विराटच्या फलंदाजीत कोणतीच तांत्रिक खराबी नसून केवळ त्याचा आक्रमक स्वभाव त्याच्या फलंदाजीत अडचण निर्माण करत आहे. इरफान म्हणाला,”मला वाटतं फलंदाजीत मिळणारं विराटचं यश हे तयारीमध्ये कमतरता नसून त्याचा आक्रमक अंदाज आहे. तो कायम अटॅकिंग खेळू इच्छितो त्यामुळे तो लवकर आपली विकेट गमावत आहे.” इरफान पठाणने आकाश चोप्राशी त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना ही गोष्ट सांगितली.

चौथ्या कसोटीत विराटच्या धावा महत्त्वाच्या

पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यांचा विचार करता भारतीय फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारताला त्रास सहन करावा लागत आहे. दुसऱ्या कसोटीतील विजयामध्येही गोलंदाजानी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान भारताला एक चांगली सुरुवात रोहित आणि राहुल करुन देत आहेत. पण त्यानंतर मधल्या फळीत विराट, रहाणे, पुजारा हे नापास होत असल्याने भारत एक चांगला स्कोर करण्यात अपयशी होत आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीत विराटने संयमी फलंदाजी करुन धावा करणे गरजेचे आहे.

भारत आणि ओवलचं मैदान

मालिकेतील चौथा कसोटी सामना असणाऱ्या ओवलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात 12 वेळा कसोटी सामने खेळवले गेले आहेत. ज्यात चार वेळा इंग्लंडने तर एका वेळेस भारताने विजय मिळवला आहे. याशिवाय 7 सामने अनिर्णीत सुटले आहेत. विशेष म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना याच मैदानावर 1936 मध्ये खेळवला गेला होता. ज्यात इंग्लंडने नऊ विकेट्सनी विजय मिळवला होता. तर या मैदानावर अखेरचा सामना 2018 साली खेळवला गेला असून यातही इंग्लंडनेच 118 धावांनी विजय मिळवला आहे. तसंच दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेने त्याच्या कारकिर्दीत ठोकलेल्या एकमेव शतकाच्या जोरावर 2007 साली भारताने ओवलच्या मैदानावर 664 धावांचा डोंगर उभा केला होता. यावेळी दिनेश कार्तिकने 91, राहुल द्रविडने 55, सचिन तेंडुलकरने 81, लक्ष्मणने 51 आणि महेंद्र सिंह धोनीने 92 धावांची खेली खेळी होती.

हे ही वाचा

Happy Birthday : सलामीच्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजाना पछाडलं, ‘हा’ ठरला भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

IND vs ENG : भारतीय संघासाठी ‘बॅड न्यूज’, भेदक गोलंदाज आणि विश्वासू फलंदाज असणारा खेळाडू चौथ्या कसोटीत इंग्लंडकडून मैदानात

(Indian Captain virat kohlis aggressive thinking is causing his batting performance says irfan pathan)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.