विराट कोहलीच्या शतकाबाबत बालपणीच्या प्रशिक्षकांची भविष्यवाणी, इंग्लंडमधील कामगिरीबद्दलही दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भारताची रनमशिन म्हणवल्या जाणाऱ्या विराटच्या बॅटमधून मागील दोन वर्ष झालं एकही शतक आलेलं नाही. त्यामुळे विराटचे चाहते इंग्लंड दौऱ्याततरी विराट शतक ठोकेल अशी आशा व्यक्त करत आहेत.

विराट कोहलीच्या शतकाबाबत बालपणीच्या प्रशिक्षकांची भविष्यवाणी, इंग्लंडमधील कामगिरीबद्दलही दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
विराट कोहली
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 2:41 PM

नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंतर (Sachin Tendulkar) जर कोणाच्या खेळाकडे भारतीय मन लावून पाहत असतील तर तो म्हणदे विराट कोहली (Virat Kohli). भारताचा लाडका कर्णधार विराट जगातील अव्वल फलंदाजामध्ये मोडतो. पण अलीकडेच त्याला आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. तो फलंदाजामध्ये थेट पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. इंग्लंडच्या कसोटी मालिका सुरु झाल्यानंतर त्याची ही घसरण झाली आहे. यावर बोलताना कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (RajKumar Sharma) म्हणाले, ”विराटची कसोटी रँकिगमधील पाचव्या स्थानावरील घसरण एक दुखद बातमी आहे. मी याबद्दल त्याच्याशी बोलणार आहे.”

ICC ने नुकतीच कसोटी फलंदाजाची जागतिक क्रमवारी जाहीर केली. यामध्ये केन विलियमसन पहिल्या स्थानावर आहे. तर  इंग्लंडचा कर्णधार जो रूट दुसऱ्या नंबरवर विराजमान आहे. तिसऱ्या नंबरवर ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ आणि चौथ्यावर मार्नस लाबुशेन आहे. ज्यानंतर विराट हा पाचव्या स्थानावर असल्याने कायम टॉप तीनमध्ये असणाऱ्या विराटसाठी हा एक धक्का आहे. विशेष म्हणजे टॉपच्या फलंदाजांमध्ये आणि विराटमध्ये तब्बल 100 गुणांचा फरक आला आहे.

शतक लवकरच- राजकुमार शर्मा

इंडिया न्यूजशी बोलताना विराटचे कोच राजकुमार शर्मा म्हणाले, ”मला नाही वाटत विराटला कोणत्याच पाठिंब्याची गरज आहे. तो खूप उत्साही असून शेवटच्या सामन्यातही तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यानंतर लॉर्ड्सवरील विजयामुळे तर त्याचा आनंदर द्विगुणीत झाला असल्याने लवकरच तो एक दमदार शतक ठोकेल हे नक्की.”

रूट एक अप्रतिम खेळाडू

विराटचे प्रशिक्षक वर्मा जो रुटबाबत बोलताना म्हणाले, ”विराटसाठी रुट कोणतीच स्पर्धा नाही. रुट एक अप्रतिम खेळाडू आहे. मी कायमच रुटच्या फलंदाजीचे कौतुक करतो. त्यात तो सध्या घरच्या मैदानावर खेळत असल्याने अधिक जोशमध्ये चांगली कामगिरी करत आहे.”

इतर बातम्या

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात ‘ही’ आहे भारताची खरी ताकद, इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

IPL 2021 आणि टी-20 विश्वचषकात हार्दिक पंड्या गोलंदाजी करणार? भारतीय प्रशिक्षकाने दिली मोठी माहिती

विश्वचषक विजेता कर्णधार डॅरेन सॅमीला भारत नाही, ‘हा’ संघ वाटतो यंदाच्या टी-20 विश्व चषकाचा दावेदार, वाचा कारण

(Indian captain Virat kohlis coach rajkumar sharma shocked on his downfall in ICC test ranking)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.