सौरव गांगुलीवर वादग्रस्त व्हिडिओ, यूट्यूबरवर मानहानीचा खटला, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

Sourav Ganguly Youtuber Case: व्हिडिओमध्ये अपमानास्पद भाषा वापरण्यात आली आहे. तसेच अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली आहे. त्यामुळे सौरव गांगुली यांच्या प्रतिष्ठेसाला धक्का बसला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

सौरव गांगुलीवर वादग्रस्त व्हिडिओ, यूट्यूबरवर मानहानीचा खटला, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
Sourav Ganguly
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 11:54 AM

Sourav Ganguly Youtuber Case:  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरब गांगुली आणि एक यूट्यूबर यांच्यात वाद निर्माण झाला आहे. कोलकात्याच्या आरजी टॅक्स घोटाळ्याबाबत संपूर्ण बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सौरव गांगुली यानेही वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर गांगुलीवर अनेक लोकांनी जोरदार हल्ला केला. त्यानंतर सौरव गांगुलीने आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे म्हटले होते. या प्रकरणात यूट्यूबर मृण्मय दास याने देखील सौरव गांगुलीबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यामुळे सौरव गांगुली तपासला आहे. गांगुलीने या यूट्यूबरविरुद्ध कोलकाता पोलिसांच्या सायबर क्राइममध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्याने सायबर बुलिंग आणि बदनामीची तक्रार केली आहे. ही तक्रार सौरव गांगुलीची सचिव तानिया भट्टाचार्य हिने ईमेलद्वारे केली आहे.

काय आहे त्या तक्रारीत

तानिया भट्टाचार्य हिने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मृण्मय दास नावाच्या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात सौरव गांगुलीची बदनामी करण्यात आली आहे. त्या व्हिडिओमध्ये अपमानास्पद भाषा वापरण्यात आली आहे. तसेच अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली आहे. त्यामुळे सौरव गांगुली यांच्या प्रतिष्ठेसाला धक्का बसला आहे. व्हिडिओमधील वक्तव्यामुळे सौरव गांगुली याचा समाजात असणारा आदर आणि प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.

या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर बदनामी आणि धमकी दिल्याबद्दल योग्य कायदेशीर कारवाई करावी. सायबर विभाग या प्रकरणी त्वरीत हस्तक्षेप करुन योग्य ती कारवाई करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे तानिया भट्टाचार्य हिने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

गांगुलीचे क्रिकेटमधील यश

सौरव गांगुली भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक कर्णधार आहे. भारताकडून तो 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो 42.18 च्या सरासरीने 7212 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 40.73 च्या सरासरीने 11363 धावा केल्या आहेत. गांगुलीने आयपीएलमध्येही कर्णधारपद आणि फलंदाजीचे कौशल्य दाखवले. गांगुली आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पुणे वॉरियर्सकडून खेळला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.