World Cup 2023 | ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाक विरुद्धच्या मॅचसाठी पीच कसा असेल? विकेट कोणासाठी फायदेशीर? जाणून घ्या डिटेल्स

World Cup 2023 | टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान या तीन टीम्स विरुद्ध खेळणार आहे. या तिन्ही मॅचसाठी पीच कसा असेल? टीम इंडियाने कोणाला खेळवल्यास फायदा होईल? त्या बद्दल जाणून घ्या.

World Cup 2023 | ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाक विरुद्धच्या मॅचसाठी पीच कसा असेल? विकेट कोणासाठी फायदेशीर? जाणून घ्या डिटेल्स
Team indiaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 1:30 PM

मुंबई : ICC World Cup 2023 स्पर्धा यंदा भारतात होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड कप रंगणार आहे. मायदेशात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळताना टीम इंडिया एकूण 9,700 किमीचा प्रवास करणार आहे. टीम इंडिया एकूण नऊ शहरात वर्ल्ड कपचे सामने खेळणार आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होत आहे. त्यामुळे सहाजिकच विजेतेपदासाठी टीम इंडिया फेव्हरेट आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे महत्वाचे सामने ज्या टीम विरुद्ध होणार आहेत, तिथल्या खेळपट्टी बद्दल जाणून घेऊया.

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप अभियानाला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पाचवेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलामीचा सामना होईल. चेन्नईमध्ये ही मॅच होणार आहे. दोन्ही टीम्सनी आतापर्यंत परस्परांविरुद्ध बरेच सामने खेळले आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.

टीम इंडियाचा पहिला सामना कुठे?

विजयाने सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पण ऑस्ट्रेलिया तुल्यबळ संघ आहे. 1987 साली भारतात त्यांनी पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. वर्ल्ड कप 2023 आधी एमए चिंदबरम स्टेडियममध्ये बरेच बदल होणार आहेत. टीम इंडियाला या स्टेडियमवर अजूनपर्यंत एकदाही 300 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. त्यावरुन तुम्ही या पीचबद्दल अंदाज बांधू शकता.

चेन्नईच्या मैदानात टीम्सच पहिलं प्राधान्य बॅटिंगला असतं. कारण नंतर खेळपट्टी धीमी होत जाते. फिरकी गोलंदाजांना ही खेळपट्टी अनुकूल आहे. यावर्षाच्या सुरुवातीला तिसऱ्या आणि निर्णायक वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं.

पाकिस्तान विरुद्ध सामन्यात विकेट कशी असेल?

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्याची सर्वांना प्रतिक्षा असते. वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सातवेळा भारताने पाकिस्तानला पराभूत केलं आहे. 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच होईल. 1984 पासून भारतीय टीम इथे 10 वनडे मॅच खेळली आहे. त्यात 8 सामने जिंकले आहेत. हे मोठं मैदान आहे. इथे धावा बनवणं सोपं नाही. हा पीच हळूहळू धीमा होत जातो. सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळेत. पण नंतर विकेट फलंदाजांना अनुकूल होत जाते. या मैदानावर धावांचा पाऊस पाहायला मिळालेला नाही. इंग्लंड विरुद्ध लखनऊमध्ये कोणाची सरशी होईल?

टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्ध सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर होईल. आयपीएल 2023 दरम्यान इकानाची विकेट स्लो होती. इथे मोठ्या धावसंख्येची अपेक्षा नाहीय. टीम इंडियाने इथे जास्त वनडे सामने खेळलेले नाहीत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना झालेला. पण पावसामुळे ही मॅच 40 ओव्हरची झाली. त्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. ही विकेट काळ्या मातीने बनवण्यात आली आहे. त्यामुळे इथे स्पिनर्सना मदत मिळेल. त्यामुळे चेंडू धीम्या गतीने बॅटवर येईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.