IND vs NZ T20 Match : काळा पीच लाल का केला? रातोरात बदल, टीम इंडिया घाबरली का?

IND vs NZ T20 Match : पीच क्यूरेटरने आधी काळी खेळपट्टी बनवली होती. पण टीम मॅनेजमेंटच्या सांगण्यावरुन त्याने अत्यंत कमी वेळेत लाल पीच बनवला. पीच बनवण्यासाठी जास्त वेळ मिळाला नाही.

IND vs NZ T20 Match : काळा पीच लाल का केला? रातोरात बदल, टीम इंडिया घाबरली का?
Hardik pandya-Rahul DravidImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 12:19 PM

IND vs NZ 2nd T20 Pitch : टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध दुसरा T20 सामना जिंकला. पण आता, या मॅचसाठी बनवण्यात आलेल्या पीचवरुन वाद निर्माण झालाय. टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन हार्दिक पंड्याने लखनौच्या पीचवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यानंतर हा पीच बनवणाऱ्या क्यूरेटरला हटवलं. खेळपट्टी अखेरच्या क्षणी बदलण्यात आली. त्यामुळे हा पीच बॅटिंगसाठी अनुकूल नव्हता, असं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलय. पीच क्यूरेटरने आधी काळी खेळपट्टी बनवली होती. पण टीम मॅनेजमेंटच्या सांगण्यावरुन त्याने अत्यंत कमी वेळेत लाल पीच बनवला. पीच बनवण्यासाठी जास्त वेळ मिळाला नाही. या विकेटवर 100 रन्सचा टार्गेट गाठताना टीम इंडियाची चांगलीच दमछाक झाली. आता प्रश्न हा आहे की, पीच क्यूरेटरला का हटवलं?

जे सांगितलं, ते त्याने ऐकलं

यात पीच क्यूरेटरची चूक काय? त्याला टीम इंडियाकडून जे सांगण्यात आलं, ते त्याने ऐकलं. इतक्या कमी वेळेत काय करणार? काळा पीच लाल मातीचा बनवण्यास का सांगण्यात आलं? हा सुद्धा प्रश्न आहे.

काळा पीच लाल का केला?

लखनौच्या पीचची वाट लावण्याची स्क्रिप्ट रांचीत लिहिण्यात आली. पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा 21 धावांनी पराभव झाला. रांचीच्या पीचवर जास्त टर्न होता. त्यामुळे 177 धावांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचता आलं नाही. रांचीच्या विकेटवर संध्याकाळी दव पडला होता. पण तरीही विकेटने फिरकी गोलंदाजांची साथ दिली. टीम इंडियाने 9 विकेट गमावून 155 धावा केल्या. कदाचित हेच कारण असावं, ज्यामुळे टीम इंडियाने लखनौच्या क्यूरेटरला लाल मातीचा पीच बनवायला सांगितला. क्यूरेटरने आधी काळ्या मातीचा पीच बनवला होता.

लाल आणि काळ्या माचीच्या पीचमध्ये फरक काय?

लाल माती आणि काळ्या मातीच्या पीचमध्ये काय फरक असतो, ते समजून घ्या. लाल मातीच्या पीचवर जास्त पेस आणि बाऊन्स असतो. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पीच लाल मातीने बनवला जातो. तिथे बॅट्समन सहज ड्राइव्ह मारु शकतात. दुसरीकडे काळ्या मातीच्या पीचवर चेंडू थोड्या फसव्या पद्धतीने बॅटवर येतो. स्पिनर्सना टर्न मिळतो. धावा करण्यासाठी बॅट्समनला खेळपट्टीवर पाय रोवून उभं रहावं लागतं. टी 20 क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे पीच फार कमी पहायला मिळतात. रांचीच्या स्पिन फ्रेंडली विकेटवर संघर्ष करणारी टीम इंडिया घाबरली का? म्हणूनच कदाचित काळ्या मातीचा पीच लाल करायला सांगितला. सहाजिकच तुम्हाला कधी या प्रश्नाच उत्तर स्पष्टपणे मिळणार नाही.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.