Video | न्यूझीलंडच्या सामन्याआधी टीम इंडियाचे खेळाडू मस्तीत दंग, इशान-ठाकूरचा डान्स, पंतकडून दिवाळी गिफ्ट

भारताचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतने मुलांना गिफ्टचं वाटप केलं. पंतने चॉकलेटने भरलेली छोटी बॅग आणली होती. संघ सहकाऱ्यांच्या मुलांना त्याने चॉकलेट दिल्या. यादरम्यान रविचंद्रन अश्विनची मुलगी, रोहित शर्माच्या लेकीने पंतकडून दिवाळी गिफ्ट घेतलं.

Video | न्यूझीलंडच्या सामन्याआधी टीम इंडियाचे खेळाडू मस्तीत दंग, इशान-ठाकूरचा डान्स, पंतकडून दिवाळी गिफ्ट
इंडियन क्रिकेट टीम
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 11:52 AM

T20 World Cup : भारतीय क्रिकेट संघाला आज आयसीसी T20 विश्वचषक-2021 मध्ये आपला दुसरा सामना खेळायचा आहे. भारताला हा सामना न्यूझीलंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळायचा आहे. भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे कारण या सामन्यातील पराभव आणि विजय उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग निश्चित करणार आहे. भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ मात्र हलक्याफुलक्या मूडमध्ये दिसला. संघातील खेळाडू खूप मस्ती करताना दिसले. टीम इंडियाचे धमाल करतानाचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये इशान किशन आणि शार्दुल ठाकूर यांची डान्स स्टाइलही पाहायला मिळत आहे.

टीम इंडिया हॅलोविन सेलिब्रेट करत होती आणि या सेलिब्रेशन दरम्यान किशन आणि ठाकूर एकमेकांचा हात हातात घेऊन नाचताना दिसले. दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून कपलप्रमाणे नाचत होते. यादरम्यान किशनने ठाकूरला एवढं जोरात ओढलं की तो पडणार एवढ्यात किशनने त्याला सावरलं. यावेळी संघातील बाकीचे खेळाडू आणि त्यांच्या बायका या दोघांच्या नृत्याचा आनंद लुटत होत्या. यावेळी कर्णधार विराट कोहलीही उपस्थित होता आणि तो मोबाईलमध्ये या दोघांचे व्हिडिओ शूट करत होता.

रिषभ पंतकडून दिवाळी गिफ्ट

भारताचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतने मुलांना गिफ्टचं वाटप केलं. पंतने चॉकलेटने भरलेली छोटी बॅग आणली होती. संघ सहकाऱ्यांच्या मुलांना त्याने चॉकलेट दिल्या. यादरम्यान रविचंद्रन अश्विनची मुलगी, रोहित शर्माच्या लेकीने पंतकडून दिवाळी गिफ्ट घेतलं.

भारतासाठी कठीण आव्हान

भारताला आज न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळायचा आहे. न्यूझीलंड हा असा प्रतिस्पर्धी आहे ज्याने टी-20 फॉरमॅट वर्ल्ड कपमध्ये भारताला वेळोवेळी टक्कर दिलीय. 2003 पासून भारताला आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडला हरवता आलेले नाही. दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले आहेत. एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले होते. 2003 आणि 2019 मध्ये हे दोन्ही संघ एकदिवसीय विश्वचषकात आमनेसामने आले होते. या दोन्हीमध्ये न्यूझीलंडने बाजी मारली होती. त्याच वेळी, हे दोन्ही संघ दोनदा टी-20 विश्वचषकात आमने सामने आले होते. या दोन्ही वेळा न्यूझीलंडने बाजी मारली. अलीकडेच, हे दोन संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आमनेसामने आले होते ज्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

(Indian cricket team enjoy halloween before new zealand match in t20 world cup)

हे ही वाचा :

T20 World Cup : हार्दिक पंड्याला आणखी एक संधी, NZ विरुद्धच्या सामन्यात जुन्या Playing XI सह टीम इंडिया मैदानात उतरणार?

T20 World Cup : टीम इंडियाचं CSK च्या पावलावर पाऊल, Playing XI बदलणार नाही

T20 World Cup : मोहम्मद रिझवानची एमएस धोनीशी बरोबरी, पुढच्या सामन्यात विक्रम मोडणार!

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.