IND vs AUS | टीम इंडियाचा विक्रमावर विक्रम, असा पराक्रम करणारा पहिला संघ

India vs Australia 4th T20I | भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत विश्वविक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव करत सलग पाचवी टी 20 मालिका जिंकण्याचा पराक्रम भारताने केला आहे. भारताच्या ऋतुराज गायकवाड याने टी 20 सामन्यात चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

IND vs AUS | टीम इंडियाचा विक्रमावर विक्रम, असा पराक्रम करणारा पहिला संघ
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 8:00 AM

रायपूर | 2 डिसेंबर 2023 : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर चौथ्या टी 20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाचा 20 धावांनी पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 175 धावांचे दिलेले आव्हान त्यांना पेलता आले नाही. भारताच्या गोलंदाजांसमोर 7 बळी गमावून ऑस्ट्रेलिया केवळ 154 धावाच करु शकला. यामुळे टीम इंडियाने या विजयासह मालिकाही जिंकली आहे. परंतु हा सामना जिंकणे भारतासाठी विश्वविक्रम ठरला. आता भारतीय संघ सर्वाधिक टी 20 सामने जिंकणारा संघ झाला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा नावावर होता.टी 20 सामन्याच्या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 4-1 अशी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

भारताचे हे विक्रम

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सलग पाचवी टी 20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या ऋतुराज गायकवाड याने टी 20 सामन्यात चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. कमी डावांत हा टप्पा गाठणारा तो न्यूझीलंडच्या डीवोन कॉन्वेसह चौथा वेगवान फलंदाज ठरला आहे. सलग तीन डावांत 200 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी 20 धावा करणारा गायकवाड हा रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली याच्यानंतर चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.

हे सुद्धा वाचा

टाय सामने धरल्यास भारताचा 139 वा विजय

भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच इतिहास रचला. टीम इंडियाने हा 136वा टी-20 विजय मिळवला. यापूर्वी सर्वाधिक टी-20 मध्ये विजय मिळवणारा संघ पाकिस्तानचा होता. पाकिस्तानने 135 सामन्यात विजय मिळवला आहे. टी-20 मध्ये टाय होणाऱ्या सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये काढला जातो. भारताचे ते विजय धरल्यास 139 सामने भारत जिंकला आहे. पाकिस्तान संघ 136 टी-20 सामने जिंकला आहे. भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानात 14 टी-20 मालिकेत विजयी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा विचार केल्यास टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव 2019 मध्ये झाला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियेने 2-0 अशी मालिका जिंकली होती.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान आणि मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.