T20 World Cup: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियात पहिली परीक्षा, आज खेळणार पहिला सामना
आज समजेल पर्थच्या फास्ट विकेटवर टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी किती सज्ज?
मुंबई: ऑस्ट्रेलियात टीम इंडियाच (Team India) मिशन वर्ल्ड कप (T20 World cup) सुरु झालं आहे. काही दिवसापूर्वीच टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. टीम इंडियाचा मुक्काम पर्थमध्ये (Perth) आहे. टीम इंडियाचे क्रिकेटपटू तिथलं वातावरण आणि ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत.
टीम इंडियाची आज 10 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियात पहिली परीक्षा होणार आहे. वाकाच्या मैदानात आज पहिला सामना होत आहे. टीम इंडिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या टीम दरम्यान सराव सामना होणार आहे.
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियात मुक्काम कुठे?
भारतीय टीम 6 ऑक्टोबरपासूनच पर्थमध्ये आहे. पहिले दोन दिवस हलका सराव केला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी आता नेट्समध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव सुरु केलाय. रविवारी 9 ऑक्टोबरला टीम इंडियाच्या खेळाडूंनी नेट्समध्ये बराचवेळ सराव केला. कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी मैदानात चांगलाच घाम गाळला.
हा सराव सामना का महत्त्वाचा?
वाकाची विकेट फास्ट आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला अनुकूल आहे. चेंडूला इथे चांगला बाऊन्स मिळतो. अशा विकेटवर फलंदाजी करणं सोपं नसेल. या मॅचमधून टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या अन्य विकेट्सची कल्पना येईल. त्यामुळे हा सराव सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे.
म्हणून रोहितसाठी ही मॅच महत्त्वाची
रोहित शर्मासाठी ही मॅच महत्त्वाची आहे. कारण ऑस्ट्रेलियाला येण्याआधी रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी 20 सामने खेळला. दोन मॅचमध्ये फक्त 2-2 चेंडू खेळला. त्याला खातही उघडता आलं नाही. त्यामुळे रोहितसाठी हा सराव सामना महत्त्वाचा आहे.
रोहित-विराटपेक्षा हा सामना या खेळाडूंसाठी महत्त्वाचा
रोहित, राहुल आणि कोहलीपेक्षा पण हा सराव सामना सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेलसाठी महत्त्वाचा आहे. कारण टीम इंडियाचे हे खेळाडू अजूनपर्यंत ऑस्ट्रेलियात एकही सामना खेळलेले नाहीत. त्यांना या मॅचमधून मिळणारा अनुभव खूप महत्त्वाचा असेल.