India Tour Of Sri lanka : श्रीलंका दौऱ्याची सर्व रणनीती ठरली, असा रवाना होणार भारतीय संघ
श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना संघी दिली आहे. दरम्यान श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी खेळाडूंना अनेक टेस्ट द्याव्या लागणार आहेत.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या (Coron Virus) संकटामुळे जगभरातील सर्वच क्रिकेट स्पर्धांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक स्पर्धा रद्द झाल्या तर वेळापत्रकासह सर्वच गोष्टीत अनेक बदल झाले आहेत. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बायो-बबल सारख्या नियमावली तयार करण्यात आल्या आहेत. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसाला लाखाच्या जवळपास रुग्ण सापडत असून हजारों कोरोनाबळीही जात आहेत. त्यामुळे पुढील महिन्यातील श्रीलंका दौऱ्याला (Sri Lanka Tour) जाणाऱ्या भारतीय संघातील (Indian Cricket Team) खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक नियमावली तयार करुन खेळाडूच्या अनेक टेस्टही केल्या जाणार आहेत. (Indian Cricket team Ready For Sri lanka tour before that need to be in Quarantine for 14 days in Mumbai)
भारतीय संघातील जे खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांना आधी दोन आठवडे मुंबईत विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यानंतर श्रीलंका येथे पोहोचल्यावरही तीन दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे. भारतीय संघ 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यात श्रीलंका संघासोबत 6 सामने खेळणार आहे. ज्यामध्ये 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांचा समावेश असेल.
चार्टर प्लेनने होणार प्रवास
श्रीलंका दौऱ्यासाठी देखील इंग्लंड दौऱ्याला गेलेल्या संघासाठी करण्यात आली होती तशीच नियमावली तयार करण्यात आली आहे. पीटीआयला एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत तो म्हणाला,“इंग्लंडला गेलेल्या संघासाठी होते तसेच नियम यावेळी देखील करण्यात आले आहेत. बाहेरच्या राज्यातून मुंबईत येणाऱ्या खेळाडूंना चार्टर फ्लाइटने आणि काहींना कमर्शियल एयरलाइनच्या बिजनेस क्लासने आणण्यात येईल. त्यानंतर मुंबईतील एका हॉटेलमध्ये 14 जून ते 28 जून पर्यंत विलगीकरणात ठेवण्यात येईल. यावेळी दर दिवसाआड म्हणजे सहा वेळा खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे.”
दौऱ्याआधी होणार संपूर्ण अभ्यास
28 जूनला विलगीकरण कालावधी पूर्ण होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ कोलंबोला रवाना होईल. तिकडेही तीन दिवस विलगीकरणात रहावे लागेल. दरम्यान या संपूर्ण कालावधीत संघाचे खेळाडू श्रीलंकेतील मैदानाची स्थिती तेथील खेळाडूंचा खेळ सध्याचा फॉर्म इत्यादीचा अभ्यास करु आपली रणनिती आखणार आहेत.
नव्या चेहऱ्यांना संधी
या दौऱ्यासाठी बीसीसीआयने (BCCI) संपूर्ण भरतीय संघाची (India tour of Sri Lanka) घोषणा केली. शिखर धवनला कर्णधारपद सोपवण्यात आलं असून बीसीसीआयने एकूण 20 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यावेळी संघात काही नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली असून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), देवदत्त पडीक्कल (Devdutt padikkal), चेतन सकारिया (Chetan Sakariya) यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
हे ही वाचा :
मोहम्मद सिराज कसा खेळणार? विराटला प्रश्न; हरभजन सिंगने भारतात बसून चुटकीसरशी प्रॉब्लेम सोडवला!
IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा…
(Indian Cricket team Ready For Sri lanka tour before that need to be in Quarantine for 14 days in Mumbai)