IND vs SL 3rd T20: श्रीलंकेला लोळवलं, ‘हे’ आहेत टीम इंडियाच्या मालिका विजयाचे 4 सुपरस्टार

IND vs SL 3rd T20: टीम इंडियाने नव्या वर्षाची शानदार सुरुवात केली आहे. या सीरीज विजयात टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी महत्त्वाचा रोल निभावलाय. ते खेळाडू कोण? ते जाणून घे्ऊया.

IND vs SL 3rd T20: श्रीलंकेला लोळवलं, 'हे' आहेत टीम इंडियाच्या मालिका विजयाचे 4 सुपरस्टार
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 8:13 AM

राजकोट: टीम इंडियाने सीरीज जिंकून 2023 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंच्या टीम इंडियाने श्रीलंकेवर T20 सीरीजमध्ये 2-1 असा मालिका विजय मिळवला. सीरीजचा तिसरा सामना शनिवारी झाला. या निर्णायक मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर 91 धावांनी विजय मिळवला. या मालिका विजयाचे स्टार कोण आहेत? ते जाणून घ्या.

सूर्याने सीरीजमध्ये एकूण किती धावा केल्या?

या सीरीजमध्ये सूर्यकुमार यादवने सध्याच्या घडीचा T20 क्रिकेटमधील तो सर्वोत्तम फलंदाज असल्याचं दाखवून दिलं. त्याने तिसऱ्या सामन्यात सेंच्युरी तर दुसऱ्या मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकवली. तो सीरीजमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने तीन मॅचमध्ये 170 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 85 आणि स्ट्राइक रेट 175.25 चा होता.

प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार कोणाला मिळाला?

अक्षर पटेल प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्काराचा मानकरी ठरला. बॅट आणि बॉलने आपण टीम इंडियासाठी किती उपयुक्त ठरु शकतो, ते पटेलने या सीरीजमध्ये दाखवून दिलं. अक्षरने तीन सामन्यात एका हाफ सेंच्युरीसह एकूण 117 धावा केल्या. तीन मॅचमध्ये त्याने तीन विकेट काढल्यात.

उमरान मलिकने किती विकेट काढल्या?

स्पीडगन उमरान मलिकने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सीरीजमध्ये उमरान मलिकने आपल्या भेदक गोलंदाजीच प्रदर्शन केलं. या सीरीजमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. तीन मॅचमध्ये त्याने सात विकेट काढल्या. त्याच्या गोलंदाजीची इकॉनमी 9.63 होती. उमरान मलिकने या सीरीजमध्ये काही बॅट्समनना क्लीन बोल्ड केलं. हे विकेट ज्या पद्धतीने काढले, त्याला तोड नव्हती. हार्दिकने कशी कामगिरी केली?

कॅप्टन हार्दिक पंड्याने या सीरीजमध्ये शानदार कॅप्टनशिप केली. टीमला विजय मिळवून देण्यात त्याचे काही निर्णय महत्त्वपूर्ण ठरले. उदहारणार्थ पहिल्या सामन्यात अक्षर पटेलच्या हाती शेवटची ओव्हर देण्याचा धाडसी निर्णय. हार्दिकने या सीरीजमध्ये दोन विकेट काढले आणि 45 धावा केल्या. या सीरीजमध्ये त्याने प्रभावी कॅप्टनशिप केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.