श्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव, इंग्लंडमधील संघाची डोकेदुखीही वाढली, ‘हे’ आहे कारण
श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघात कोरोनाने शिरकाव केला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची बाधा झाल्याने संपूर्ण संघावर कोरोनाची टांगती तलवार आहे.
लंडन : श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील (Indian Cricket Team) खेळाडू कृणाल पंड्याला (Krunal Pandya) कोरोनाची बाधा झाली आहे. मंगळवारी (27 जुलै) सकाळी त्याची कोरोना टेस्ट केली असता ती पॉजिटिव्ह आली. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या संपूर्ण भारतीय संघावर कोरोनाचे सावट आले असून याचे पडसाद इंग्लंड दौऱ्यावरी भारतीय संघावरही उमटू शकतात.
The second #SLvIND T20I has been postponed by a day after Krunal Pandya tested positive for Covid-19.
Details ?
— ICC (@ICC) July 27, 2021
कृणाल कोरोनाबाधित आढळल्याने मंगळवारी भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात होणारा दुसरा टी-20 सामना पुढे ढकलण्यात आला आहे. हा सामना सर्व खेळाडूंची टेस्ट निगेटिव्ह आल्यास बुधवारी खेळवला जाऊ शकतो. यासोबतच सर्व खेळाडूंची कोरोना टेस्टही करण्यात येत आहे. दरम्यान भारतीय संघातील 8 सदस्य हे कृणालच्या अधिक संपर्कात आल्याने त्यांना विलगीकरणात ठेवले आहे. यामध्ये पृथ्वी शॉ (Pruthvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही असून काही दिवसांतच हे दोघे इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघात सामिल होण्यासाठी रवाना होणार होते. मात्र सध्यातरी त्यांना विलगीकरणात ठेवले असून त्यांचा कोरोना रिपोर्ट जसा येईल त्यावर त्यांचा इंग्लंडचा दौरा ठरेल. त्यामुळे दुखापतींमुळे तीन खेळाडू मालिकेबाहेर गेलेल्या भारतीय संघाच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.
भारतीय संघाला दुखापतींची बाधा
इंग्लंडच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला दुखापतींच ग्रहण लागलं असून सद्यस्थितीला तीन भारतीय खेळाडू दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडले आहेत. यामध्ये काउंटी xi संघाकडून सराव सामना खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरसह आवेश खानचा समावेश आहे. तर तिसरा खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) भारताचा सलामीवीर शुभमन गिल आहे. WTC Final दरम्यान शुभमनला दुखापत झाली होती. त्यामुळे सामन्यानंतर शुभमनने दौऱ्यातून माघार घेत तो मायदेशी परतला आहे. त्यामुळे शुभमन आणि सुंदरच्या जागी पृथ्वी आणि सूर्यकुमारला इंग्लंडला रवाना करण्यात येणार होते.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.
अशी आहे टीम इंडिया :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर (दुखापतग्रस्त), जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा
राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान (दुखापतग्रस्त) आणि अर्जान नाग्वासवाला.
हे ही वाचा
IND vs SL : भारताच्या अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची बाधा, दुसरा टी-20 सामना पुढे ढकलला
IND vs ENG : भारताचे दोन कसोटी फलंदाज संघात परत, ‘हे’ दोन खेळाडू होणार संघातून बाहेर
(Indian Cricket teams Krunal Pandya Tested Corona positive question raised on Pruthvi and suryakuamars England tour)