फिल्डिंग कोच आर. श्रीधरच्या जागी ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची वर्णी?, T20 World Cup नंतर होणार घोषणा

सध्या भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर (Coach R Sridhar) हे विश्वचषकानंतर पदावरुन पायउतार होणार असल्याने त्याजागी आता नव्या व्यक्तीची नेमणूक करण्याचं काम सुरु आहे.

फिल्डिंग कोच आर. श्रीधरच्या जागी 'या' माजी भारतीय क्रिकेटपटूची वर्णी?, T20 World Cup नंतर होणार घोषणा
आर श्रीधर धोनीसह
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 11:56 PM

मुंबई: सध्या सुरु असलेल्या टी20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) अनेक बदल होणार आहेत. यात सर्वात मोठा बदल म्हणजे भारतीय संघाचे प्रशिक्षक बदलणार असून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसह (Ravi Shastri) इतर कोचिंग स्टाफही बदलणार आहे. तसंच विराट कोहली (Virat Kohli) हा देखील टी20 कर्णधारपद सोडणार आहे. दरम्यान शास्त्रींसह कोचिंग स्टाफमध्ये फिल्डिंग कोच असणारे आर. श्रीधर (Coach R Sridhar) हे देखील पदावरुन पायउतार होणार असल्याने त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची नेमणूक करण्याचे काम सध्या सुरु आहे.

याजागी माजी क्रिकेटपटू अभय शर्मा (Abhay Sharma) यांनी अप्लाय केलं असून ते श्रीधर यांची जागा घेण्याची शक्यता आहे. शर्मा यांनी भारत ए, भारत अंडर-19 आणि राष्ट्रीय महिला संघासोबत काम केलं आहे. दरम्यान श्रीधर यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर संपणार असून त्यावेळी 52 वर्षीय अभय यांना भारतीय क्रिकेट संघासोबत फील्डिंग कोच म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

संघ सोडताना आर श्रीधर भावूक

आर. श्रीधर विश्वचषकानंतर राजीनामा देणार असल्याने त्यांनी संघापासून वेगळं होण्याआधी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. श्रीधर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर लिहिलेल्या भल्यामोठ्या पोस्टमध्ये सर्वांचे आभार मानत त्यांच प्रशिक्षक म्हणूनचा कार्यकाळ शब्दात रेखाटला आहे. श्रीधर हे 2014 साली भारतीय संघासोबत फिल्डिंग कोच म्हणून जॉईन झाले. तेव्हापासून आतापर्यंत ते संघासोबत असून सध्या सुरु असलेल्या टी20 विश्वचषकानंतर रवी शास्त्रींसोबतच ते देखील संघाला राम राम करणार आहेत.

श्रीधर यांनी त्यांच्या भावनिक पोस्टमध्ये स्वत:चा मैदानावरील फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की, ‘2014 ते 2021  या काळात संघाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल BCCI चं धन्यवाद. मी संपूर्ण मेहनतीने माझं काम केलं आहे. यावेळी माझ्याकडून काही चूका झाल्याही असतील तरी आज संघ एका चांगल्या स्थानावर विराजमान आहे.’ पुढे त्यांनी अनेकांचे आभार मानले यात रवी शास्त्रींचे आभार मानाता ‘मी कायम त्यांचा ऋणी राहिन.’ असंही त्यांनी लिहिलं. तर दोन्ही कर्णधार धोनी आणि विराट कोहली यांचही खूप-खूप धन्यवाद. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. असंही त्यांनी लिहिलं सोबतच अजिंक्य रहाणे, रोहित शर्मासह यांच्यासह सर्व खेळाडू  अनिल कुंबळे, संजय बांगर, विक्रम राठोर, भरत अरुण इत्यांदीचंही धन्यवाद या पोस्टमध्ये श्रीधर यांनी केलं आहे.

हे ही वाचा-

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा उत्साह शिगेला, एक आव्हान पूर्ण करताच भारताचा विजय पक्का

T20 World Cup मधील बांग्लादेशचं आव्हान कायम, ओमानवर 26 धावांनी विजय

T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास

(Indian Cricketer Abhay sharma may take place as team indias fielding coach on poistion of R Sridhar)

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.