Harbhajan singh : हरभजन सिंह या पार्टीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा, हर्भजनचा तो फोटो तुफान व्हायरल
हरभजन सिंहने जलंधरमधून निवडणूक लढवावी यासाठी पंजाबमधील सत्ताधारी पार्टी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरलाय. यात काँग्रेसकडून विचारविनिमय सुरू असल्याच्याही चर्चा आहेत.
मुंबई : भारताचा लोकप्रिय फिरकी गोलंदाज हरभजन सिंह सध्या राजकारणात उतरणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. कारण हरभजनचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होतोय. या चर्चा हरभजनपर्यंत पोहोचल्यावर हरभजनने याबद्दल खुलासाही केला आहे. अलिकडेच हरभजन सिंह आणि काँग्रेस नेते आणि पूर्व क्रिकेटर नवज्योत सिद्धू यांच्यात भेट झाली, त्यानंतरच या चर्चा सुरू झाल्या आहेत.
हरभजन सिंह काँग्रेसकडून निवडणूक लढवणार?
हरभजन सिंहने जलंधरमधून निवडणूक लढवावी यासाठी पंजाबमधील सत्ताधारी पार्टी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरलाय. यात काँग्रेसकडून विचारविनिमय सुरू असल्याच्याही चर्चा आहेत. पंजाबमध्ये निवडणुकीआधी राजकीय हालचाली वाढल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष लोकप्रिय चेहऱ्यांना आपल्या पक्षात सामील करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यातच अलिकडेच हरभजन सिंह आणि नवज्योत सिद्धू यांची भेट झाल्याने हरभजन काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर हरभन सिंहने गप्प न राहता याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
Picture loaded with possibilities …. With Bhajji the shining star pic.twitter.com/5TWhPzFpNl
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) December 15, 2021
भेटीबाबत हरभजन सिंहचे स्पष्टीकरण
काँग्रेस हरभजनला निवडणूक लढवू इच्छित असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भेटीबाबत स्पष्टीकरण देताना हरभजन सिंह म्हणाला की, ही एक सदिच्छ भेट होती. ही राजकीय भेट नव्हती. सिंद्धू इतरांसाठी नेते असतील मात्र आमच्यासाठी ते एक वरिष्ठ क्रिकेटर आहेत, त्यामुळेच मी त्यांची भेट घेतली, तुम्ही अपवांवर विश्वस ठेवू नका. हरभजनच्या राजकारणात येण्याच्या चर्चा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा, नवज्योत सिद्धू यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आणि त्याला कॅप्शनही तसेच दिले होते. याआधीही हजभजन सिंह भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र हरभजनने स्पष्टीकरण देत, आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.