दुसऱ्याची बॅट उधार घेऊन खेळले क्रिकेट, आज अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू झाल्यानंतर विकत घेतलं 30 कोटींच घर

मेहनत आणि आपण करत असलेल्या कामाप्रति निष्ठा असल्यास यश नक्कीच मिळतं. याचच एक उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय संघातील हे दोघे भाऊ आहेत.

दुसऱ्याची बॅट उधार घेऊन खेळले क्रिकेट, आज अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू झाल्यानंतर विकत घेतलं 30 कोटींच घर
हार्दीक आणि कृणाल पंड्या
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 12:54 PM

मुंबई : भारतीय संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू असणाऱ्या हार्दीक पंड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पंड्या  (Krunal Pandya) यांनी नुकतंच मुंबईत तब्बल 30 कोटीचं घर विकत घेतलं. हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेल्या या भावांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. पण आपल्या मेहनतीच्या आणि अप्रतिम खेळाच्या जोरावर दोघांनी अखेर यश मिळवलच आहे.

मूळचे गुजरातचे असणारे हे दोघे भाऊ एका सामन्य कुटुंबातून आहेत. एकेकाळी केवळ मॅगी खाऊन पोट भरणाऱ्या पंड्या बंधूनी मित्रांची बॅट उधार घेऊन क्रिकेटचा सराव केल्याचेही त्यांनी मुलाखतीत सांगितले होते. पण जबरदस्त अष्टपैलू खेळीच्या जोरावर आधी मुंबई इंडियन्स संघात प्रवेश मिळवल्यानंतर दोघांनी परत कधीच मागे वळून पाहिले नाही. आधी हार्दीक आणि अलीकडे कृणालची देखील भारतीय संघात वर्णी लागल्यानंतर दोघेही कमाल कामगिरी करत आहेत. नुकतेच श्रीलंकेच्या दौऱ्यातही दोघे भाऊ एकत्र खेळताना दिसून आहे. त्यानंतर नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार दोघांनी मिळून मुंबईमध्ये एक आलीशान फ्लॅट विकत घेतला आहे.

8 बेडरुम्सचं आलिशान घर

पंड्या बंधूनी विकत घेतलेल्या या फ्लॅटची किंमत 30 कोटी रुपये आहे. 3 हजार 838 स्केयर फीटच्या या फ्लॅटमध्ये 8 बेडरूम आहेत. पंड्या बंधूचा हा फ्लॅट मुंबईतील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या रुस्तमजी पॅरामाउंट याठिकाणी आहे. इथे अनेक बॉलीवुड सिनेस्टार देखील राहतात. डीएनएच्या वृत्तानुसार हार्दिक आणि कृणालच्या या घरात जिम, गेमिंग जोन आहे. तसंच एक प्रायवेट स्विमिंग पूल आणि प्रायवेट थिएटर देखील आहे.

इतर बातम्या

IND vs SL 3rd T20 Live : श्रीलंकेचा भारतावर दणदणीत विजय, टीम इंडियानं टी-20 मालिका गमावली

विराट, रोहितनंतर ‘हा’ फलंदाजही तिन्ही क्रिकेट प्रकारातील ‘कम्प्लीट पॅकेज’, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

(Indian Cricketer Hardik and krunal pandya buys 30 crore flat in mumbai)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.