10 सामन्यांत घेतले 67 विकेट्स तरीही भारतीय संघात जागा नाही, ‘या’ गोलंदाजाने मांडली व्यथा

भारताच्या 29 वर्षीय गोलंदाजाला रणजी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरीनंतरही श्रीलंका दौऱ्यासाठी जाणाऱ्या संघात स्थान मिळालेले नाही. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने आपलं मत मांडल आहे.

10 सामन्यांत घेतले 67 विकेट्स तरीही भारतीय संघात जागा नाही, 'या' गोलंदाजाने मांडली व्यथा
जयदेव उनाडकट
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 5:11 PM

मुंबई : भारताचे दिग्गज खेळाडू सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पुढील महिन्यातील श्रीलंका दौऱ्यासाठी सर्व नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. बऱ्याच नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली असली तरी 29 वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) स्थान दिलं गेलंल नाही. निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा उनाडकटला डावलल्याने जयदेवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपले मत मांडले आहे. जयदेवने 2019-2020 च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत तब्बल 67 विकेट्स घेत सौराष्ट्र संघाला विजय मिळवून दिला होता. (Indian Cricketer Jaydev Unadkat Feel Sad For not selected in Indian Team For Sri Lanka Tour)

जयदेवने ट्विटर वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘मी बालपणीपासून या खेळातील दिग्गज खेळाडूंना पाहून प्रेरित झालेलो आहे. त्यांना पाहूनच मी क्रिकेट खेळू लागलो आणि नंतर मेहनत करुन स्वत:ला आणखी चांगला क्रिकेटर करण्याचा प्रयत्न केला.’

‘क्रिकेटने मला खूप काही दिलं.’

जयदेवने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘मी क्रिकेटमधून खूप काही शिकलो. कधीही हार मानायची नाही हेही मी क्रिकेटमधूनच शिकलो. मी तरुण असताना अनेकांनी मला खराब खेळणारा, छोट्या शहरातून येऊन मोठी स्वप्न पाहणारा अशी अनेक नावे ठेवली. पण माझा खेळ पाहून हळूहळू त्यांचे विचार बदलले. मी देखील स्वत:ला आणखी मजबूत केलं. जीवनात उतार-चढाव तर येतातच. मी आता सिलेक्ट नाही झालो तर काय झालं याआधी मला संधी मिळाली आहे त्यामुळे भविष्यातही जेव्हा मिळायची तेव्हा मिळेलच.’

तीन वर्षांपूर्वी शेवटचा सामना

जयदेव उनाडकट इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्स संघाकडून (Rajsthan Royals) खेळतो. 2010 मध्ये उनाडकटने भारतीय संघात पदार्पण केले. ज्यानंतर तो भारतीय संघासाठी एक टेस्ट, सात वनडे आणि 10 टी-20 सामन्यांत खेळला आहे. भारताकडून शेवटची मॅच तो 2018 मध्ये खेळला होता.

संबधित बातम्या :

T20 World Cup : टी 20 वर्ल्डकप भारतात होणार की नाही, BCCI च्या बैठकीत काय ठरलं?

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची तारीख ठरली, पण BCCI पुढे ही सर्वांत मोठी अडचण!

(Indian Cricketer Jaydev Unadkat Feel Sad For not selected in Indian Team For Sri Lanka Tour)

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....