‘हा’ क्रिकेटपटू षटकार ठोकण्यात वस्ताद, भारतीय संघात मात्र संधी नाही, वैतागून क्रिकेट सोडण्याची धमकी

मुंबई : क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा या षटकार ठोकल्यावरच मिळतात. असे असताना देखील रणजी सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत षटकारांचे शतक करणारा एक भारतीय क्रिकेटपटू इंडियन टीमपासून अजूनही दूर आहे. शेल्‍डन जॅक्सन (Sheldon Jackson) असं या खेळाडूच नाव असून तो रणजी स्पर्धेत पद्दुचेरी संघाकडून खेळतो. (Indian Cricketer Sheldon Jackson Hit 100 Plus Sixes in Ranji Trophy) शेल्‍डनने क्रिकेटनेक्‍स्‍टशी […]

'हा' क्रिकेटपटू षटकार ठोकण्यात वस्ताद, भारतीय संघात मात्र संधी नाही, वैतागून क्रिकेट सोडण्याची धमकी
शेल्डन जॅक्सन
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 4:43 PM

मुंबई : क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा या षटकार ठोकल्यावरच मिळतात. असे असताना देखील रणजी सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत षटकारांचे शतक करणारा एक भारतीय क्रिकेटपटू इंडियन टीमपासून अजूनही दूर आहे. शेल्‍डन जॅक्सन (Sheldon Jackson) असं या खेळाडूच नाव असून तो रणजी स्पर्धेत पद्दुचेरी संघाकडून खेळतो. (Indian Cricketer Sheldon Jackson Hit 100 Plus Sixes in Ranji Trophy)

शेल्‍डनने क्रिकेटनेक्‍स्‍टशी बोलताना रणजी मध्ये उत्तम कामगिरी करुनही भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने खंत व्यक्त केली. तो म्हणाला, ”रणजी ट्रॉफी स्पर्धा ही जगातील काही अवघड स्पर्धेमधील एक स्पर्धा आहे. याच कारण रणजी स्पर्धेत दर आठवड्याला एका नव्या मैदानात खेळावे लागते. त्यामुळे एकाच सीजनमध्ये विविध प्रकारच्या खेळपट्टीवर खेळून स्वत:ला साबित करावे लागते. तसेच स्वत:च्या मानसिकतेसह खेळात बदल आणावा लागतो.”

…तर क्रिकेट सोडून देईन

शेल्‍डनने सांगितलं की, ”माझं वय 30 वर्षांहून अधिक असल्याने लोक माझ्यावर टीका करत होते. त्यामुळे स्वत:ला साबित करण्यासाठी मला उत्तमप्रकारे खेळावे लागते. मात्र रणजीसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत 100 हून अधिक षटकार खेचूनही माझ्याबद्दल लोकांना माहित नसेल. तर मला प्रेरणा मिळण बंद होईल आणि असं झाल्यास मी क्रिकेट खेळण सोडून देईन.”

रणजीमध्ये शेल्डनची धडाकेबाज कामगिरी

शेल्‍डन जॅक्सन भारताच्या त्या चार खेळाडूंमध्ये येतो, ज्यांनी रणजी ट्रॉफीच्या चार सीजनमध्ये 750 हून अधिक धावा केल्या आहेत. यात शेल्डनसोबत अभिनव मुकुंद, विनोद कांबळी आणि अजय शर्मा यांचा समावेश होतो. शेल्‍डनने 76 प्रथम श्रेणी सामन्यांत 49.42 च्या सरासरीने 5 हजार 634 धावा केल्या आहेत. ज्यात 19 शतक आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शेल्डनच्या नावे 115 षटकारांची नोंद आहे. तसेच लिस्ट एच्या 60 सामन्यांत 37.42 च्या सरासरीने शेल्डनने 2 हजार 96 धावा केल्या आहेत. ज्यात 7 शतकांसह 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

हे ही वाचा :

टीम इंडियाला क्रिकेट विश्वचषक मिळवून दिला, आता 28 व्या वर्षीच भारताला बाय बाय, देशही सोडला

ICC Meeting : क्रिकेट इतिहासातील ‘ती’ मोठी स्पर्धा पुन्हा खेळवली जाणार, भारताला पाकिस्तानकडून बदला घेण्याची सुवर्णसंधी

दुबईत ठरलं…. 8 वर्षांत होणार 16 वर्ल्ड कप फायनल, प्रत्येक वर्षी भारत पाकिस्तान थरार!

(Indian Cricketer Sheldon Jackson Hit 100 Plus Sixes in Ranji Trophy)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.