भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटूचा तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतला संन्यास

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा रेकॉर्ड नावावर असणाऱ्या या खेळा़डूने टी-20 विश्वचषकाला काही महिने शिल्लक असताना हा मोठा निर्णय़ घेतला आहे.

भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटूचा तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतला संन्यास
स्टुवर्ट बनी
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 3:03 PM

मुंबई : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू स्‍टुअर्ट बिन्‍नीने (Stuart Binny) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने सोमवारी (30 ऑगस्ट) ही माहिती दिली. मागील बराच काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या बिन्नीने हा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी त्याला पुढील जीवनासाठी शुभेच्छ दिल्या आहेत. सोशल मीडियावरही त्याला अनेक क्रिकेटप्रेमी शुभेच्छा देत आहेत.

37 वर्षीय बिन्‍नी 2016 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. रणजीसारख्या स्थानिक स्पर्धांमध्ये दिसणारा बिन्नी पुन्हा भारतीय संघात येण्यासाठी प्रयत्न करत होता. पण अखेर संधी न मिळाल्याने टी-20 विश्वचषकाच्या तोंडावर बिन्नीने हा निर्णय घेतला आहे. बिन्नीने 2014 मध्ये न्‍यूझीलंड संघाविरुद्ध इंटरनेशनल क्रिकेटमध्ये डेब्‍यू केला होता. त्याने भारताकडून 6 कसोटी, 14 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत.

‘हा’ रेकॉर्ड अद्याप अतूट

स्टुवर्ट य़ाने कारकिर्दीत काही खास कामगिरी केली नसली तरी त्याच्या नावावर एक रेकॉर्ड आजही आहे. जो कोणताच भारतीय तोडू शकला नाही. त्याने एकदिवसीय सामन्यात 2014 साली बांग्‍लादेशच्या विरुद्ध केवळ 4 धावा देत 6 विकेट पटकावले होते. त्याचा हा रेकॉर्ड आजही कायम आहे.

स्टुवर्टची कारकिर्द

बिन्‍नीने कसोटी क्रिकेटमध्ये 194 धावा आणि 3 विकेट घेतले आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यांत 230 धावांसह 20 विकेट पटकावले आहेत. याशिवाय टी-20 सामन्यांत 35 धावा करत 1 विकेट घेतला आहे. तर 95 प्रथम श्रेमी सामन्यात बिन्नीने 4 हजार 796 धावा करत 148 विकेट घेतले आहेत.

हे ही वाचा :

रहाणे, पुजारा, ईशांतला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती? 3 नव्या खेळाडूंची नावं चर्चेत, प्लेईंग इलेव्हन बदलणार

तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार

Cheteshwar Pujara : संयमी खेळीला शतकाचा साज नाहीच, चेतेश्वर पुजाराचं शतक पुन्हा हुकलं, दोन वर्षांपासून दुष्काळ!

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.