Photo : भारतीय क्रिकेटपटूंची बच्चेकंपनीसोबत इंग्लंडमध्ये मस्ती, विराटपासून रोहितपर्यंत सर्वच झाले व्यस्त
इंग्लंडमध्ये सध्या सर्व भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्याची तयारी करत आहे. मात्र ज्या क्रिकेटपटूंना मुलं आहेत, त्यांना सरावासोबतच मुलांनाही वेळ द्यावा लागतो आहे.
pujara Family
Follow us
भारतीय संघ (Indian Team) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर (England Tour) असून आधी न्यूझीलंडसोबत (NewZealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final) खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळणार आहे. इतक्या मोठ्या दौऱ्यामुळे संघाला फॅमिलीला सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. विवाहीत खेळाडू त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. (Indian Cricketer Virat Kohli Rohit Sharma Pujara Rahane Shares Photo With Daughters in England)
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) त्याची मुलगी आर्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.
या फोटोत तो हिल्टन हॉटेलच्या बाल्कनीमध्ये तिच्यासोबत बसलेला दिसत आहे. रहाणेच्या मुलीचा जन्म नोव्हेंबर, 2019 मध्ये झाला आहे.
भारताचा महत्त्वाचा फिरकीपटू आर. आश्विनला देखील दोन मुली आहे. त्या दोघीही त्याच्यासोबत इंग्लंडमध्ये
असून आश्विनने इंग्लंडच्या हॉटेलमधील तिघांचा फोटो शेअर केला आहे.
सलामीवीर चेतेश्वर पुजाराही आपल्या मुलीसोबत वेळ घालवत असून त्यानेही दोघांचा फोटो शेअर केला आहे. दोघांची जोडी हिल्टन हॉटेलमध्येच
असून दोघेही मज्जा करताना दिसत आहेत.
कर्णधार विराटही त्याच्या पत्नी अनुष्का (Anushka Sharma) आणि मुलीसोबत इंग्लंडला पोहोचला आहे. विराटची मुलगी वामिकाचा हा पहिलाच
परदेश दौरा आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये वामिकाचा जन्म झाला होता.
हिटमॅन रोहित शर्मानेही पत्नी रितीका आणि मुलगदी समायरासोबत इंग्लंडमध्ये रिलॅक्स करताना दिसत आहे. त्याच्या सोशल मीडियावर तिघांचे फोटो दिसत आहेत.