भारतीय क्रिकेटपटूला एलिस पेरीसोबत डेटवर जाण्याची इच्छा, पाहा तिने काय दिले उत्तर
भारतीय क्रिकेटपटू नेहमीच त्यांच्या कामगिरीमुळे चर्चेत असतात. पण जेव्हा ते बाहेर असतात तेव्हा ते बिनधास्तपणे बोलत असतात. अशाच एका भारतीय खेळाडूला जेव्हा विचारण्यात आले होते की, त्याला डेटवर जायला कोणासोबत आवडेल. त्यावर उत्तर देताना त्याने ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूचे नाव घेतले होते.
WPL 2024 : ऑस्ट्रेलियाची क्रिकेटपटू एलिस पेरी सुंदर खेळाडूंपैकी एक आहे, सध्या ती WPL 2024 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. पेरीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एलिस पेरीने 15 धावांत 6 विकेट घेतले आणि नाबाद 40 धावा केल्या. ज्यामुळे आरसीबीने मुंबई इंडियन्सचा पराभव करत प्ले-ऑफमध्ये प्रवेश केलाय.
ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी सध्या चमकदार कामगिरी करत आहे. आरसीबी संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या WPL 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात RCB ने मुंबई इंडियन्सचा 5 धावांनी पराभव केला.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची खेळाडूं एलिस पेरी तिच्या अभिनयामुळे सोशल मीडियावर देखील चर्चेत असते. तिचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आहे. हा व्हिडिओ 2020 चा आहे. ज्यामध्ये भारतीय क्रिकेटपटूसोबत डेटवर जाण्याबद्दल तिने उत्तर दिले आहे.
व्हिडिओमध्ये अँकरने एलिस पेरीला जेव्हा प्रश्न केला की, मुरली विजयला जेव्हा विचारण्यात आले की लॉकडाऊननंतर त्याला कोणत्या दोन लोकांसोबत जेवायला जायला आवडेल का? त्यावर तो म्हणाला की, शिखर धवन आणि तू. यावर तू काय उत्तर देशील? यावर एलिस पेरी म्हणाली की, ‘असे असेल तर मला आशा आहे की तो पैसे देईल. ही माझासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मी खूप आनंदी आहे.’
An off-field conversation between @EllysePerry and @PathakRidhima filled with some googly questions 😮, out of the park answers🤩, well-judged tackles 😎 and rapid 🔥 right on the 💸#SonyTenPitStop #CricketWithoutBoundaries #CricketAustralia #Australia #SonySports @CricketAus pic.twitter.com/V6Weqj2QET
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) May 2, 2020
एलिमिनेटर सामन्यात पेरीने मुंबई इंडियन्सविरुद्ध ६६ धावांची चांगली खेळी केली. गोलंदाजी करताना तिने एका फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, त्यामुळे आरसीबीने मुंबईचा ५ धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरीत पोहोचली. रविवारी दिल्ली कॅपिटल्ससोबत त्यांचा अंतिम सामना होणार आहे.