IND vs ENG : विराट कोहलीला आणखी एक झटका, दोन दिवसांत दुसरा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर
भारतीय संघ इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी डरहम येथे काउंटी xi संघासोबत सराव सामने खेळत आहे. या सामन्यात भारताचे दोन खेळाडूंना दुखापत झाल्याने संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी सराव म्हणून काउंटी xi संघासोबत डरहम येथे सराव सामना खेळत आहे. पण याच सराव सामन्यात भारताला दोन झटके बसले असून संघातील दोन खेळाडूंना दुखापत झाली आहे. यामुळे ते मालिकेतून बाहेर गेले आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) आणि अष्टपैलू खेळाडू वॉशिंगटन सुंदर (Washington Sundar) या दोघांना सामन्यादरम्यान दुखापत झाली आहे.
आवेश खानला 20 जुलैला सुरु झालेल्या सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी अंगठ्याला दुखापत झाली. तर दुसऱ्याच दिवशी सुंदर यालाही बोटालाच दुखापत झाली. हे दोघेही काउंटी xi कडून सराव सामना खेळत होते. या दुखापतीमुळे दोघांचाही इंग्लंड दौरा जवळपास संपला असून या दौैऱ्यात ते एकही सामना खेळू शकणार नाहीत.
24 खेळाडूंपाकी 3 जण दुखापतीमुळे मालिकेबाहेर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेपूर्वीच भारताचे तीन युवा खेळाडू दौऱ्यातून बाहेर झाले आहेत. यामध्ये काउंटी xi संघाकडून सराव सामना खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरसह आवेश खानचा समावेश आहे. तर तिसरा खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) भारताचा सलामीवीर शुभमन गिल आहे. WTC Final दरम्यान शुभमनला दुखापत झाली होती. त्यामुळे सामन्यानंतर शुभमनने दौऱ्यातून माघार घेत तो मायदेशी परतला आहे.
कोहली आणि रहाणेच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह
भारतीय संघासाठी आणखी चिंतेची बाब म्हणजे संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या फिटनेसबाबतही चर्चा होत आहे. कोहली पाठीच्या त्रासामुळे तर रहाणे पायाला सूज आल्यामुळे सराव सामना खेळले नाहीत. त्यामुळे इंग्लंड सिरीजपूर्वी दोघेही फिट होतील अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.
अशी आहे टीम इंडिया :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर (दुखापतग्रस्त), जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा
राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान (दुखापतग्रस्त) आणि अर्जान नाग्वासवाला.
हे ही वाचा
IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन
IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय
(Indian Cricketer Washington Sundar also got injured before India vs England test series)