Rishabh Pant Accident: काय झालं? ऋषभ पंतची कार अचानक कशी पलटली?

Rishabh Pant Accident: उत्तराखंडच्या रुडकी जवळ ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झालाय. हा अपघात कसा घडला, ते जाणून घ्या....

Rishabh Pant Accident: काय झालं? ऋषभ पंतची कार अचानक कशी पलटली?
rishabh car accident
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 12:32 PM

डेहराडून: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतसोबत शुक्रवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. ऋषभ पंतच्या कारला दिल्ली-डेहराडून हायवेवर रुडकी जवळ अपघात झाला. ऋषभची कार डिवायडरला धडकली. पंतची कार या धडकेनंतर पलटली. त्यानंतर कारला आग लागली. पंत कसाबसा कारच्या बाहेर पडला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. ऋषभला या अपघातात गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्या पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे. आता प्रश्न हा आहे की, पंतसोबत ही दुर्घटना कशी घडली? पंतची कार कशी पलटी झाली?

ऋषभ कुठे चाललेला?

ऋषभ पंत शुक्रवारी दिल्लीवरुन रुडकीला चालला होता. रुडकीला ऋषभच घर आहे. त्याची कार नारसन जवळ पोहोचताच डिवायडरच्या खांबाला धडकली. त्यानंतर कार पलटी झाली. रिपोर्ट्सनुसार ऋषभ पंत स्वत: कार ड्राइव्ह करत होता. त्यात त्याच्याकडून कुठेतरी चूक झाली.

पंतच्या डोळ्यावर झोप?

ऋषभ पंत एकटाच गाडी चालवत होता. त्याच्यासोबत कारमध्ये कोणी नव्हतं. ड्रायव्हिंग करताना पंतचा डोळा लागल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटलं असावं. कार ज्या पद्धतीने खांबाला धडकली, त्यावरुन कारचा वेग 80 ते 100 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. कार एवढ्या वेगात असतानाच पलटी होते. त्यात आग लागण्याची शक्यता असते. पंतसोबत सुद्धा असंच घडलं असावं. पंत स्वत: त्याची कार चालवत होता. ही एक मजबूत कार मानली जाते. ऋषभच्या कारचा जो अपघात झालाय, त्यात जीव वाचण्याची शक्यता कमी असते. पंतला गंभीर दुखापत

ऋषभ पंतला सुरुवातीला स्थानिक लोकांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागलाय. पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पंतची विचारपूस केली. त्याला डेहराडूनच्या रुग्णालयात रेफर केलय. पंतला या अपघातातून बर होण्यासाठी 3 ते 4 महिने लागू शकतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.