भारतीय खेळाडूचा इंग्लंडविरुद्ध धमाकेदार डेब्यू, सलामीच्या सामन्यातच दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सला गवासणी
इंग्लंडच्या बलाढ्य संघाविरुद्ध भारतीय क्रिकेट टीममधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या खेळाडूने फलंदाजी आणि गोलंदाजीसह असामान्य क्षेत्ररक्षणाचे दर्शनही घडवले होते.
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीच्या सामन्यात एक अप्रतिम खेळ करणे प्रत्येक खेळाडूचेच स्वप्न असते. त्यात कसोटी सामना असेल तर एक वेगळाच जोश असतो. कसोटी पदार्पण अविस्मरणीय करण्याचं स्वप्न ‘या’ भारतीय क्रिकेट संघातील (India Cricket Team) खेळाडूने देखील पाहिलं होतं. पण त्याने असा विचार नव्हता केला की सलामीच्या सामन्यातच तो दोन वर्ल्ड रेकॉर्ड करेल. टीम इंडियाच्या (Team India) या दिग्गज खेळाडूचं नाव यर्जुवेंद्र सिंह (Yajurvindra Singh) असून त्याने इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी पदार्पण (Test Debut) केलं होतं. आजच त्याचा जन्मदिवस देखील आहे.
1 ऑगस्ट, 1952 रोजी जन्माला आलेल्या यर्जुवेंद्र सिंहने बंगळुरु येथे 1976-77 च्या टेस्टमध्ये डेब्यू केला होता. या सामन्यात त्याला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळवण्यात आले होते. फलंदाजीने काही खास योगदान न देऊ शकलेल्या यर्जुवेंद्रने क्षेत्ररक्षणात मात्र कमाल केली. एका डावात पाच झेल पकडत यर्जुवेंद्रने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. त्यानंतर दुसऱ्या डावातही आणखी दोन झेल पकडत एकूण सामन्यात 7 झेल पकडण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही बनवला.
अशी होती क्रिकेट कारकिर्द
भारतीय क्रिकेटर यर्जुवेंद्र सिंहने टीम इंडियासाठी केवळ चारच कसोटी सामने खेळले. पण त्यातही दोन वर्ल्ड रेकॉर्ड केले होते. या 4 सामन्यातील 7 डावात फलंदाजीमध्ये एक वेळेस नाबाद राहत 18.16 च्या सरासरीने यर्जुवेंद्रने 109 धावा केल्या. ज्यामध्ये नाबाद 43 रन हा सर्वोच्च स्कोर आहे. यासोबत प्रथम श्रेणी सामन्यात 78 मॅचमध्ये 42.30 च्या सरासरीने 3 हजार 765 रन यर्जुवेंद्रच्या नावावर आहेत. ज्यात 9 शतकांचाही समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोलंदाजीत 50 विकेट्सही यर्जुवेंद्रच्या नावावर आहेत. यर्जुवेंद्र सिंहने 17 लिस्ट ए सामन्यात 43.41 च्या सरासरीने 521 रन्स केले असून नाबाद 85 हा सर्वोच्च आहे. यासोबतच लिस्ट ए सामन्यात 8 विकेट्सही यर्जुवेंद्रच्या नावावर आहेत.
(Indian cricketer yajurvindra singh debuted against england and sets world record of five catches in an innings on this day)