Video : धोनीने लावली घोड्यासोबत शर्यत, पत्नी साक्षीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ पाहाच

महेंद्रसिंग धोनी सध्या त्याच्या रांची येथील फार्महाऊसवर फॅमिलीसोबत निवांत वेळ घालवत आहे. तो आपल्या पाळीव प्राण्यांसोबत मस्ती करत असल्याचे याआधीही अनेक व्हिडीओतून आपलं पाहिलं आहे.

Video : धोनीने लावली घोड्यासोबत शर्यत, पत्नी साक्षीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ पाहाच
महेंद्रसिंग धोनी
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 4:30 PM

रांची : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. आपल्या अप्रतिम खेळामुळे भारताला अनेक चषक मिळवून देणाऱ्या धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता कोरोनाच्या संकटामुळे इंडियन प्रिमियर लीग (IPL 2021) देखील स्थगित झाल्यामुळे धोनी फॅमिलीसोबत त्याच्या रांची येथील फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. धोनीची पत्नी साक्षी तिच्या सोशल मीडियावर धोनीचे फार्म हाऊसवरील प्राण्यांसोबत मस्तीचे, झाडावरुन फळ काढतानाचे असे वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करते. जे धोनी फॅन्स न चूकता पाहून शेअर करतात, असाच एक व्हिडीओ साक्षी धोनीने शेअर केला असून त्यात धोनीने चक्क एका घोड्यासोबत शर्यत लावली आहे. (Indian Former Cricketer MS Dhoni Enjoys Race With his Horse Wife Sakshi Shares Video)

धोनीला मोटरबाईक कार यांची आवड असल्याचं सर्वांनाच माहित आहे. त्याच कलेक्शनही साऱ्यांनी पाहिलं आहे. पण धोनी हा पाळीव प्राण्यांवर देखील खूप प्रेम करत असून त्याच्या फार्महाऊसवर अनेक प्रकारचे प्राणी आहेत. ज्यात कुत्रे, गायी यांच्यासह परदेशी घोडे देखील आहेत. यातीलच स्कॉटलँडवरुन मागवलेल्या शेटलँड जातीच्या घोड्यासह धोनी चक्क शर्यत खेळत आहे.

काय आहे व्हिडीओ ?

या व्हिडीओमध्ये धोनी ब्लॅक टी-शर्ट, पँटसह स्पोर्ट शूज घालून त्याच्या फार्महाऊसवरील गार्डनमध्ये पळत आहे. त्याच्या सोबत त्याचा घोडा जो अजूनही वयाने लहान आहे, तो देखील धावत आहे आणि जणूकाय धोनीची त्याच्यासोबत शर्यतच लागली आहे, असं दिसून येत आहे. या व्हिडीओला साक्षी धोनीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. धोनीचे चाहते या व्हिडीओला कमालीची पसंती देत असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

धोनीला खेळताना पाहण्यासाठी फॅन्स उत्सुक

कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेली IPL 2021 सप्टेंबरमध्ये युएईमध्ये सुरु करणार असल्याची माहिती बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी दिली. त्यामुळे आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. त्याआधी सोशल मीडियावर धोनीची एक झलक पाहण्यासाठीही चाहते वाट पाहत असतात. त्यामुळे या व्हिडीओला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे.

(Indian Former Cricketer MS Dhoni Enjoys Race With his Horse Wife Sakshi Shares Video)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.