Cricketer Death: मृत्यू होण्याच्या काहीवेळ आधी भारतीय क्रिकेटपटूने नर्सकडे पेपर मागितला, त्यावर लिहिलं, ‘तुम्ही मला….’

Cricketer Death: रणजीत जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या 28 वर्षीय क्रिकेटपटूचा अचानक मृत्यू. सिद्धार्थच्या अखेरच्या शब्दांबद्दल समजल्यानंतर सगळेच हळहळले

Cricketer Death: मृत्यू होण्याच्या काहीवेळ आधी भारतीय क्रिकेटपटूने  नर्सकडे पेपर मागितला, त्यावर लिहिलं, 'तुम्ही मला....'
Siddharth SharmaImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 10:59 AM

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट विश्वाला एका युवा वेगवान गोलंदाजाच्या अकाली निधनामुळे मोठा धक्का बसलाय. सिद्धार्थ शर्माने वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नुकतच रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याने जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. इडन गार्डन्सवर त्याने कमालीची बॉलिंग केली होती. सिद्धार्थच्या प्रदर्शनामुळे हिमाचल प्रदेशला पश्चिम बंगाल विरुद्ध पराभव टाळता आला. बंगालला आपल्या घराच्या मैदानात ड्रॉ मॅचवर समाधान मानाव लागलं. सिद्धार्थच्या गोलंदाजीसमोर बंगालच्या टीमने शरणागती पत्करली. त्याने दोन्ही इनिंगमध्ये मिळून 7 विकेट काढल्या. सिद्धार्थ आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच 5 विकेटच्या क्लबमध्ये दाखल झाला. दुर्देवाने सिद्धार्थसाठी हाच शेवटचा सामना ठरला.

त्या शब्दांनी सर्वच हळहळले

या सामन्यानतंर 20 दिवसांनी सिद्धार्थच निधन झालं. 28 वर्षाचा सिद्धार्थ शर्मा अचानक आजारी पडला. त्याच्यावर उपचार सुरु होते. पण तो मृत्यूवर मात करु शकला नाही. सिद्धार्थने मृत्यूने अनेकांना हादरवून सोडलय. मृत्यूच्या आधी सिद्धार्थचे जे शेवटचे शब्द होते, त्याने सर्वच हळहळले.

वडिल आर्मीमध्ये होते

सिद्धार्थचा जुना मित्र आणि हिमाचल टीममधील त्याचा सहकारी प्रशांत चोपडाने सिद्धार्थच्या अखेरच्या शब्दांबद्दल खुलासा केला. त्याचे ते शब्द ऐकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. सिद्धार्थचे वडील लष्करात होते. त्यांनी सिद्धार्थला सुरुवातीला क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी नाकारली होती.

मनातली गोष्ट कागदावर उतरवली

सिद्धार्थ ICU मध्ये होता, तेव्हा तो बोलूही शकत नव्हता. म्हणून त्याने नर्सकडे एक पेपर मागितला. त्यावर ‘मला क्रिकेट खेळू द्या. मला क्रिकेट खेळण्यापासून थांबवू नका’ असं त्याने लिहिलं.

आई-वडिल परदेशात

सिद्धार्थने बडोद्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थचे आई-वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्य हे विदेशात राहतात. भाऊ कॅनडातून भारतात आल्यानंतर सिद्धार्थवर अंत्यसंस्कार करण्यात आले. व्हेटिंलेटरवर होता

सिद्धार्थवर गेल्या काही दिवसांपासून व्हेटिंलेटरवर उपचार सुरु होते. बडोदा विरुद्धच्या सामन्यात सिद्धार्थ टीममध्ये होता. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थला सामन्याआधी उलटी व्हायला लागली. ज्यामुळे त्याला लघवी करायला त्रास जाणवू लागला. त्यानंतर सिद्धार्थला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर सिद्धार्थची प्रकृती ढासळत गेली. सिद्धार्थच्या निधनाने संपूर्ण हिमाचल प्रदेश क्रिकेट संघ दु:खात आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.