घर सोडल्यानंतर गांगुलीचा आधार मिळाला, स्टार बनल्यानंतर 3 वेळा मनात आला आत्महत्येचा विचार

आज भारताच्या स्टार गोलंदाजाचा वाढदिवस (Birthday) आहे. स्टार बनण्यासाठी त्याला घर सोडावं लागलं. त्याने बाहेरच्या जगाशी संघर्ष केला. आयुष्यात वाईट काळ अनुभवला.

घर सोडल्यानंतर गांगुलीचा आधार मिळाला, स्टार बनल्यानंतर 3 वेळा मनात आला आत्महत्येचा विचार
mohammed shamiImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 9:01 AM

मुंबई: आज भारताच्या स्टार गोलंदाजाचा वाढदिवस (Birthday) आहे. स्टार बनण्यासाठी त्याला घर सोडावं लागलं. त्याने बाहेरच्या जगाशी संघर्ष केला. आयुष्यात वाईट काळ अनुभवला. पण हा स्टार खेळाडू (Star player) डगमगला नाही. तो त्याच्या निश्चयावर ठाम होता. बऱ्याच संघर्षानंतर अखेर त्याला यश मिळालं. टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू आहे मोहम्मद शमी. (mohammed shami) भारतीय गोलंदाजीचा तो प्रमुख आधारस्तंभ आहे.

आपलं शहर सोडावं लागलं

मोहम्मद शमीचा इथवरच प्रवास अजिबात सोपा नव्हता. आज क्रिकेट विश्वात मोहम्मद शमीने आपली वेगळी ओळख बनवली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीचा धाक वाटतो. क्रिकेट मध्ये नाव कमावण्यासाठी मोहम्मद शमीला आपलं शहर सोडावं लागलं. नाईलाजाने दुसऱ्या राज्याच्या टीम कडून क्रिकेट खेळला. या प्रवासात त्याला बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची साथ मिळाली.

शमी बनणं सोपं नाही

3 सप्टेंबर 1990 साली मोहम्मद शमीचा जन्म झाला. आज तो 32 वर्षांचा आहे. आज रिव्हर्स स्विंग हे त्याच्या भात्यातील प्रमुख अस्त्र आहे. भल्या भल्या दिग्गज फलंदाजांना त्याच्या या चेंडूचा धाक वाटतो. आज क्रिकेट विश्वातील मोठ्या गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीचा समावेश होतो. शमीच्या आयुष्यात कठीण काळ सुद्धा आला. जेव्हा त्याच्या मनात आत्महत्येचे विचार आले. पण त्याने स्वत:ला कणखर बनवलं. नकारार्थी विचारांवर विजय मिळवला.

यूपीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं

मोहम्मद शमी पश्चिम बंगालच्या रणजी संघाकडून क्रिकेट खेळतो. त्याला आधी यूपीकडून खेळायचं होतं. पण राजकारणामुळे त्याच्यातील गोलंदाजाला न्याय मिळाला नाही. अंडर 19 टीम मध्ये संधी मिळाली नाही. शमी पश्चिम बंगाल मध्ये आला. तिथल्या स्थानिक क्लबकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

‘तो’ मोठा टर्निंग पॉइंट ठरला

नेट्स मध्ये मोहम्मद शमीला एकदा सौरव गांगुलीला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. तो त्याच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. शमीच्या गोलंदाजीने गांगुली प्रभावित झाला. बंगालच्या सिलेक्टर्सना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. अखेर 2010 साली त्याला बंगलाच्या रणजी संघात स्थान मिळालं. जानेवारी 2013 मध्ये शमीने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये डेब्यु केला. त्यानंतर मोहम्मद शमीने कधी मागेवळून पाहिलं नाही.

'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज.
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'.
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार.
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या.
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?.
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?.
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?.
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले..
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले...
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा.