IPL 2022 Mega Auction: आज पहिल्यादिवशी 161 खेळाडूंवर लागेल बोली, ‘हा’ खेळाडू सर्वात महागडा ठरू शकतो
IPL च्या 15 व्य़ा सीजनसाठी आज बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन (Mega Auction) पार पडणार आहे. आयपीएलमध्ये यंदा आठ ऐवजी दहा संघ असून एकूण 590 खेळाडूंवर बोली लागेल.
बंगळुरु: IPL च्या 15 व्य़ा सीजनसाठी आज बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन (Mega Auction) पार पडणार आहे. आयपीएलमध्ये यंदा आठ ऐवजी दहा संघ असून एकूण 590 खेळाडूंवर बोली लागेल. यात 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) हे दोन नवीन संघ आहेत. मेगा ऑक्शनची सुरुवात आज दुपारी 12 वाजता होईल. लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण 161 खेळाडूंवर बोली लागेल. यात युवा खेळाडूंसोबत अनेक मोठे प्लेयर्स आहेत. आज जगातील अन्य देशांमध्ये आयपीएल सारख्या टी 20 लीग स्पर्धा होतात. पण त्यांना आयपीएलची सर नाहीय. कारण आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला जागतिक क्रिकेटमध्ये एक ओळख मिळते. शिवाय हे खेळाडू पैशाने मालामाल होतात. आयपीएल इतका पैसा दुसऱ्या कुठल्याही लीगमध्ये नाहीय.
कुठल्या खेळाडूंचा लिलाव आधी होणार मार्की खेळाडूंवर बोली लावण्यापासून ऑक्शनची सुरुवात होईल. या यादीत शिखर धवन, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, पॅट कमिन्स, कागिसो राबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डिकॉक, फाफ डुप्लेसिस, डेविड वॉर्नर हे खेळाडू आहेत.
या लिस्टमधील सर्व नावांवर एक मोठी रक्कम खर्च होऊ शकते. संघांसाठी सुद्धा या खेळाडूंचा लिलाव आधी होणं फायद्याचं आहे. कारण मार्की खेळाडूंनंतर अन्य युवा खेळाडूंवर टीम्सना सहज खर्च करता येईल.
मार्की खेळाडूंनंतर कोण? मार्की खेळाडूंशिवाय 151 प्लेयर्सवर बोली लावली जाईल. या प्लेयर्सची त्यांच्या खेळानुसार वेगवेगळ्या सेटमध्ये विभागणी होईल. फलंदाज आणि गोलंदाजांचा वेगवेगळा सेट असेल.
खेळाडूंचे एकूण 62 सेट तयार करण्यात आले आहेत. फलंदाज, गोलंदाज, ऑलराऊंडर, विकेटकिपर असे वेगवेगळे सेट तयार केले आहेत. पहिल्या दिवसाच्या लिलावात त्यांच्यावर बोली लागेल.
पहिल्या दिवशी अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लागेल. यात श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरेल अशी शक्यता आहे. अय्यरशिवाय जेसन होल्डर, सुरेश रैना, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, डॅवेन ब्राव्हो, दीपक चहर, इशान किशन, इयन मॉर्गन, जॉनी बेयरस्टो, देवदत्त पडिकल या मोठ्या स्टार्सवर फ्रेंचायजीच्या नजरा असतील.