आर. आश्विनची कमाल, इंग्लंडमध्ये उडवतोय धमाल, 13 ओव्हरमध्ये केलं अर्ध्या संघाला बाद

संपूर्ण भारतीय संघ 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेची वाट पाहत आहे. तर फिरकीपटू आर आश्विन मात्र मैदानात उतरला असून काउटी क्रिकेटमध्ये अप्रतिम गोलंदाजीचे दर्शन घडवत आहे.

आर. आश्विनची कमाल, इंग्लंडमध्ये उडवतोय धमाल, 13 ओव्हरमध्ये केलं अर्ध्या संघाला बाद
आर. आश्विन
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 6:54 PM

लंडन : भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी (Ind vs Eng Test) सराव म्हणून इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये (County Cricket) सरे (Surrey) संघाकडून खेळत आहे. समरसेट (Somerset) संघाविरुद्ध पहिल्या डावांत अत्यंत सुमार कामगिरी केलेल्या आश्विनने दुसऱ्या डावात मात्र समरसेटच्या (Somerset) फलदांजाना हैरान करुन सोडलं. अश्विनने दिवस सुरु झाल्यानंतर काही वेळातच तब्बल पाच विकेट घेत समरसेट संघाची हालत 60 धावांवर सात बाद अशी केली. यावेळी त्याने 13 ओव्हरमध्ये केवळ 23 धावा देत 4 मेडन ओव्हरही फेकले.

समरसेट संघाच्या दुसऱ्या डावात आश्विनने त्याच्या चौथ्या ओव्हरमध्ये स्टीवन डेविस (7) ला बाद करत पहिलं यश मिळवलं. मग लगेचच पुढच्याच ओव्हरमध्ये टॉम लेमनबायला (3) तंबूत धाडलं. काही वेळातच जेम्स हिल्ड्रेथ (14) याला आपला तिसरा शिकार करत आश्विनने तिन विकेट मिळवल्या. त्यानंतर जॉर्ज बार्टलेट (12) आणि रुल्फ वान डर मर्व (7) या दोघांना माघारी धाडत आश्विनने त्याचे पाच विकेट पूर्ण केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हा आश्विनचे 49 वा फाइव विकेट हॉल आहे.

इंग्लंड विरुद्ध सामन्याची तयारी

ICC WTC 23 चे वेळापत्रक नुकतेच जाहिर झाले. त्यानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यातील 4 ऑगस्टरपासूनची कसोटी मालिका ही भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिली पायरी आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या मालिकेसाठी भारताला तगड्या तयारीची गरज आहे. मात्र इंग्लंड कसोटीआधी भारतीय खेळाडू कोणतेच सराव सामने खेळणार नाहीत. त्यामुळे सराव होण्याकरता बीसीसीआय (BCCI) आणि आश्विन यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी (England Cricket Board) बातचीत केल्यानंतर त्याला काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली.

हे ही वाचा :

ICC WTC23 : वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचे वेळापत्रक जाहिर, ‘असे’ असतील टीम इंडियाचे सामने

‘हा’ भारतीय खेळाडू खेळतोय काउंटी क्रिकेट, सुट्ट्या मध्येच सोडून परतला मैदानावर, 25 ओव्हरमध्ये दिले केवळ 5 चौकार

भारतीय महिलांना 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यश, दिर्घकाळापासूनची अपयशाची मालिका खंडित

(Indian Spinner R Ashwin Takes 5 wickets Haul for Surrey Against Somerset in County Cricket Before India vs England Test Series)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.