विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?

आगामी टी-20 विश्व चषक (T20 World Cup) काही दिवसांवर आला असताना, टीम इंडियात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. भारताचा कर्णधार विराटची बदली होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?
विराट कोहली
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 10:47 AM

मुंबई : एकीकडे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलचा उत्साह, त्यानंतर बहुप्रतिक्षीत टी-20 विश्वचषकाचा थरार भारतीय क्रिकेटप्रेमींना अनुभवायचा असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कर्णधारपद सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार असणारा विराट कसोटी सोडता एकदिवसीय आणि टी-20 चं कर्णधारपद सोडणार असल्याचं या रिपोर्टमधून समोर येत आहे.

भारतीय संघ सद्यस्थितीला अतिशय दमदार असा संघ आहे. प्रत्येक क्रिकेट प्रकारात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या भारतीय संघाने अलीकडे कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. दिग्गज संघाना त्यांच्या भूमीत धुळ चारणाऱ्या भारतीय संघाने कर्णधार विराटच्या मदतीने ही कामगिरी केली आहे. पण अशातच विराटला टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे तो स्वत:च्या मर्जीनेच या दोन्ही प्रकारातील कर्णधारपदक सोडल्याचं म्हटलं जात आहे.

कोण घेईल विराटची जागा?

विराटची जागा घेण्यासाठी सर्वात मोठा आणि योग्य पर्याय हा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हाच आहे. रोहितने भारतीय संघाचं काही सामन्यात उत्तमरित्या नेतृत्त्व केलं आहे. टी-20 संघाचा विचार करता जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असणाऱ्या आयपीएलच(IPL) जेतेपद रोहितनेच मुंबईला तब्बल 5 वेळा मिळवून दिले आहे. याशिवाय रोहितने भारताला  एकदिवसीय सामन्यांचा आशिया कप यासारखी स्पर्धाही जिंकवून दिली आहे. त्यामुळे विराटसाठी तोच योग्य पर्याय असेल.

विराट कोहली स्वत: घोषणा करणार?

BCCI सूत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहली T20 विश्वचषकानंतर स्वत: कर्णधारपद सोडण्याची घोषणा करु शकतो. आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तो हा निर्णय घेऊ शकतो. विराट कोहली सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवतो. मात्र आता नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्मासोबत ‘शेअर’ करण्याचा निर्णय विराटने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे ही वाचा-

T20 world Cup 2021 साठी भारतापासून ऑस्ट्रेलियापर्यंत सर्वांचे संघ जाहीर, पाहा कोणते खेळाडू खेळणार एका क्लिकवर

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

T 20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, अश्विनला संधी, शार्दूल ठाकूर रिजर्वमध्ये, धोनी मेंटरच्या भूमिकेत

(Indian T20 Cricket team captain will change Virat Kohli will quit T20 captaincy says report)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.