विराट कोहलीला वर्कआउट व्हिडीओ शेअर करण पडलं महाग, फॅन्सने केली टीका, म्हणाले…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभवानंतर टीम इंडिया इंग्लंडसोबत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी कर्णधार विराट कोहली सराव म्हणून व्यायाम करत आहे. पण या व्यायामाचा व्हिडीओ शेअर केल्याने त्याला फॅन्सनी सुनावलं आहे.

विराट कोहलीला वर्कआउट व्हिडीओ शेअर करण पडलं महाग, फॅन्सने केली टीका, म्हणाले...
विराट कोहली फिटनेस व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 5:41 PM

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कायम कोणत्या न कोणत्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याच्याकडे एक क्रिकेटपटूसह फिटनेस आणि स्टाईल आयकॉन म्हणूनही पाहिलं जातं. तो त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतो. त्याच्या व्यायामसह खाण्यापिण्याचे वेळापत्रक आणि गोष्टीही सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तोही अनेकदा आपले वर्कआऊट व्हिडीओ पोस्ट करतो. पण अलीकडेच त्याने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवरुन त्याला फॅन्सकडून ऐकून घ्यावं लागलं आहे. (Indian Team Captain Virat Kohli Trolled for Sharing Workout Video)

नुकत्याच झालेल्या WTC Final मध्ये भारताला न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कोहलीचे कर्णधार म्हणून आयसीसी चषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा अपूरेच राहिले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तो जास्त काही पोस्ट करतान दिसत नव्हता. पण त्याने नुकताच एक वर्कआउटचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे.

विराट कोहली ट्रोल

विराट कोहलीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. त्याने 2-3 छोटे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यावर फॅन्सनी विराटला ट्रोल करत काही कमेंट्स लिहिल्या आहेत. फॅन्सनी विराटला फलंदाजीवर लक्ष देण्याच सल्ला दिला आहे. तर काहींनी क्रिकेट सोडून वेटलिफ्टिंग कर आणि त्यात देशाला सुवर्णपदक मिळव असा खोचक सल्लाही दिला आहे. तर काही निराश चाहत्यांनी वजन नको आयसीसी चषक उचल असाही सूर लावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

दोन वर्षांपासून शतकाची प्रतिक्षा

सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वांधिक शतकं नावावर असणाऱ्या विराट कोहलीच्या बॅटमधून मागील 2 वर्षापासून एकही  शतक निघालेले नाही.  त्याने बांग्लादेशविरोधात 2019 च्या डे-नाइट टेस्टमध्ये शेवटचे शतक ठोकले होते.तेव्हापासून त्याने एकही शतक लगावलेले नाही. तो WTC Final मध्ये शतक लावेल अशी आशा चाहत्यांना होती पण तो अर्धशतकही ठोकू शकला नाही.

हे ही वाचा :

‘इन लव्ह विथ यु…’ भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्माची पत्नीसह धबधब्याखाली धमाल!

IND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून परतीचे आदेश

भारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच ‘हा’ दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या खेळाडूची मोठी घोषणा

(Indian Team Captain Virat Kohli Trolled for Sharing Workout Video)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.